VIDEO: पॅरिसमध्ये ऐकू आला स्फोटाचा प्रचंड मोठा आवाज; संपूर्ण शहरात खळबळ

By कुणाल गवाणकर | Published: September 30, 2020 05:05 PM2020-09-30T17:05:14+5:302020-09-30T17:05:29+5:30

शहरासह आसपासच्या उपनगरांमध्ये प्रचंड घबराट; नागरिक दहशतीत

major Blast Heard In Paris France After A Jet Plane Reportedly Broke Sound Barrier | VIDEO: पॅरिसमध्ये ऐकू आला स्फोटाचा प्रचंड मोठा आवाज; संपूर्ण शहरात खळबळ

VIDEO: पॅरिसमध्ये ऐकू आला स्फोटाचा प्रचंड मोठा आवाज; संपूर्ण शहरात खळबळ

Next

पॅरिस: चालू वर्ष अनेक वाईट घटनांमुळे लक्षात राहणार असल्याचं दिसत आहे. कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात आहे. बैरुतमध्ये प्रचंड मोठा स्फोट झाल्याची दुर्घटना ऑगस्टमध्ये घडली. यानंतर अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या जंगलात मोठी आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. यानंतर आज फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये स्फोटाचा प्रचंड मोठा आवाज ऐकू आला. त्यामुळे संपूर्ण पॅरिस आणि आसपासच्या उपनगरांमध्ये एकच घबराट पसरली. थोड्या वेळानं हा आवाज एका जेट विमानातून आल्याचं स्पष्ट झालं. 

स्फोटाचा मोठा आवाज झाल्यानं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. अचानक इतका मोठा आवाज कुठून आला, असा प्रश्न नागरिकांना पडला. अनेकांनी आपत्कालीन यंत्रणेला फोन केले. त्यानंतर पोलिसांनी जेट विमानातून मोठा आवाज आल्याचं सांगितलं. जेट विमानानं साऊंड बॅरियर तोडल्यानं स्फोटासारखा आवाज झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. एखादं जेट विमान आवाजापेक्षा जास्त वेगानं उडतं, त्यावेळी स्फोट होतो. त्याला सोनिक बूम (Sonic Boom) असं म्हटलं जातं.



नेमका आवाज कशामुळे होतो?
एखाद्या वस्तूचा वेग आवाजापेक्षा जास्त असल्यास त्याला सुपरसॉनिक स्पीड असं म्हटलं जातं. निर्वात पोकळीत ध्वनीचा वेग ३३२ मीटर प्रति सेंकद इतका असतो. त्यामुळे एखादी वस्तू ३३२ मीटर प्रति सेकंदापेक्षा जास्त वेगानं धावते, त्यालाच सुपरसॉनिक स्पीड असं म्हणतात. विमान ध्वनीपेक्षा अधिक वेगानं उडतं असतं, तेव्हा सोनिक बूम निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात ध्वनी ऊर्जा निर्माण होत असल्यानं विमान येण्याच्या आधी कोणताही आवाज ऐकू येत नाही. मात्र विमान गेल्यावर मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज ऐकू येतो.

पॅरिसमध्ये का पसरली भीती?
स्फोटाचा आवाज ऐकू आल्यानं पॅरिसचे नागरिक घाबरले. जगप्रसिद्ध आयफेल टॉवरमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देणारा फोन पोलिसांना नुकताच एका व्यक्तीनं केला होता. त्यामुळे आयफेल टॉवर बंद करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आयफेल टॉवरमध्ये तपास सुरू केला. २०१५ मध्ये शार्ली एब्दो नावाच्या वृत्तपत्राच्या कार्यालयात दहशतवादी हल्ला झाला होता. त्याची सुनावणीही नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे फ्रान्स आणि विशेषत: पॅरिसमधील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Web Title: major Blast Heard In Paris France After A Jet Plane Reportedly Broke Sound Barrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Parisपॅरिस