पाकिस्तानमध्ये मोठा रेल्वे अपघात, हजारा एक्स्प्रेस रुळावरून घसरली, १५ जणांचा मृत्यू, ५० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 03:43 PM2023-08-06T15:43:30+5:302023-08-06T15:44:07+5:30
Railway Accident In Pakistan: पाकिस्तानमध्ये आज सकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला असून, त्यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची तर ५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तानमध्ये आज सकाळी एक मोठा रेल्वेअपघात झाला असून, त्यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची तर ५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. कराचीहून रावळपिंडीला जाणाऱ्या हजारा एक्स्प्रेसला हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहजादरपूर आणि नवाबशाह या दरम्यान, असलेल्या सहारा रेल्वे स्टेशनजवळ रावळपिंडीकडे जाणाऱ्या हजारा एक्स्प्रेसचे सात डबे उलटले. या अपघातामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ५० जण जखमी झाले आहेत. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त ट्रेनमधून मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करत असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात झाली आहे. तसेच आजूबाजूच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ट्रेन रुळावरून घसरण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पाकिस्तानमधील जियो न्यूजने रेल्वे विभागीय अधीक्षक सुक्कूर महमुदूर यांच्या हवाल्याने सांगितले की, दुर्घटनेमुळे अप मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. दरम्यान, हीच ट्रेन या वर्षाच्या सुरुवातीला दुर्घटनेतून बचावली होती, अशी माहितीही समोर येत आहे.