सीमा सुरक्षा भक्कम बनवा- चीन

By admin | Published: June 29, 2014 02:09 AM2014-06-29T02:09:04+5:302014-06-29T02:09:04+5:30

सागरी सीमेच्या संरक्षणासाठी एक मजबूत प्रणाली विकसित करा, असे आवाहन चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशाच्या सशस्त्र दलाला केले.

Make border security strong- China | सीमा सुरक्षा भक्कम बनवा- चीन

सीमा सुरक्षा भक्कम बनवा- चीन

Next
>बीजिंग : परदेशी शक्तींच्या धमक्यांना प्रत्युत्तर देता यावे यासाठी जमीन व सागरी सीमेच्या संरक्षणासाठी एक मजबूत प्रणाली विकसित करा, असे आवाहन चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशाच्या सशस्त्र दलाला केले. 
दुस:या महायुद्धादरम्यान जपानने चीनवर केलेल्या आक्रमणाविषयी चर्चा करताना ते म्हणाले की, देश गरीब, लाचार व कमजोर असतानाचा काळ विसरू शकत नाही. तेव्हा प्रत्येक जण आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत होता. 
परदेशींनी चीनवर शेकडो वेळा आक्रमणो करून चीनला दु:खाच्या सागरात बुडविले. तो काळ विसरू नका असे सांगून त्यांनी एक मजबूत सीमा सुरक्षा प्रणाली तयार करण्याचे आवाहन केले. देशाच्या सुरक्षेसाठी सीमांवर अधिक सतर्कतेने लक्ष ठेवून देशाच्या सागरी हद्दींच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. चीनचा अनेक देशांसोबत सीमावाद आहे. 
(वृत्तसंस्था)
 

Web Title: Make border security strong- China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.