नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा, देशाला त्यांची गरज; पाकिस्तानी नागरिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 10:13 AM2023-02-25T10:13:23+5:302023-02-25T10:13:52+5:30

आमच्याकडे मोदी असते तर नवाझ शरीफ, बेनझीर, इम्रान किंवा जनरल परवेझ मुशर्रफ यांचीही गरज भासली नसती असं म्हणत नागरिक मोदींचे कौतुक करत आहेत.

Make Narendra Modi PM, country needs him; Demand of Pakistani citizens | नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा, देशाला त्यांची गरज; पाकिस्तानी नागरिकांची मागणी

नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा, देशाला त्यांची गरज; पाकिस्तानी नागरिकांची मागणी

googlenewsNext

इस्लामाबाद/नवी दिल्ली : अन्नासाठी मोताद झालेल्या पाकिस्तानाला आता भारताची आठवण होऊ लागली आहे. पाकिस्तानचे नागरिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत असून, मोदींना पाकिस्तानचे पंतप्रधान करा, अशी ते मागणी करत आहेत.

पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजदचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिक मोदींचे कौतुक करताना दिसत आहेत. पाकचे नागरिक म्हणतात की, नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान असते तर तेथील लोकांना कमी किमतीत वस्तू खरेदी करता आल्या असत्या.

मोदींनी आमच्यावर राज्य करावे...
एक नागरिक म्हणाला की, आमच्याकडे मोदी असते तर नवाझ शरीफ, बेनझीर, इम्रान किंवा जनरल परवेझ मुशर्रफ यांचीही गरज भासली नसती. पाकिस्तानला फक्त पंतप्रधान मोदींची गरज आहे. आम्ही मोदींचे नेतृत्व मानायला तयार आहोत. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की आम्हाला मोदी मिळावेत आणि त्यांनी आमच्या देशावर राज्य करावे.

Web Title: Make Narendra Modi PM, country needs him; Demand of Pakistani citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.