११ वर्षांची मुलगी तयार करतेय अभेद्य पासवर्ड

By Admin | Published: November 1, 2015 11:51 PM2015-11-01T23:51:40+5:302015-11-01T23:51:40+5:30

न्यूयॉर्क सिटीत राहणाऱ्या ११ वर्षीय मीरा मोदी या मुलीने अभेद्य असणारा पासवर्ड तयार केला असून, ती हॅकर्ससमोर आव्हान बनली आहे. हा पासवर्ड ती दोन डॉलरमध्ये (१३० रुपये) विकत आहे.

Making an 11-year-old daughter is an impenetrable password | ११ वर्षांची मुलगी तयार करतेय अभेद्य पासवर्ड

११ वर्षांची मुलगी तयार करतेय अभेद्य पासवर्ड

googlenewsNext

न्यूयॉर्क : न्यूयॉर्क सिटीत राहणाऱ्या ११ वर्षीय मीरा मोदी या मुलीने अभेद्य असणारा पासवर्ड तयार केला असून, ती हॅकर्ससमोर आव्हान बनली आहे. हा पासवर्ड ती दोन डॉलरमध्ये (१३० रुपये) विकत आहे.
मीरा मोदी ही सहाव्या इयत्तेत शिकत आहे. ती डाईसच्या (फासे) मदतीने सहा शब्दांचा पासवर्ड तयार करते. हा पासवर्ड युजर्सना लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे. पासवर्ड सोपा बनविण्यासाठी जुन्या डाईसवेअरची पद्धती वापरते.
या पद्धतीने ती एक वाक्प्रचार करते आणि त्याची मदत घेऊन ती सहा शब्दांचा पासवर्ड तयार करते. हा पासवर्ड हॅकर्ससुद्धा हॅक करू शकत नाहीत. मीराने ‘डाईसवेअर पासवर्डस् डॉट कॉम’ या नावाने वेबसाईट तयार केली आहे. त्या वेबसाईटवरून कोणीही हा अभेद्य पासवर्ड प्राप्त करू शकतो. डाईसवेअर हे वाक्प्रचार तयार करणारे जुने तंत्रज्ञान आहे. त्यात डाईसचा वापर केला जातो. डाईसद्वारे स्पेशल डाईसवेअर वर्ल्ड लिस्टमधून दोन शब्द निवडतो. या लिस्टमधील प्रत्येक शब्द पाच डिजिटसच्या क्रमांकाच्या भविष्यवाणीसाठी आधार म्हणून घेतले जातात. सर्व डिजिटस् १ ते ६ क्रमांकांच्या दरम्यान असतात. त्यानुसार आपल्याला पाच डाईसचा उपयोग करताना यादीतील एक शब्द निवडण्याची सुविधा देते. याच आधारावर आलेल्या सहा शब्दांचा एक वाक्पप्रचार बनतो, त्यापासून पासवर्ड बनविला जातो. (वृत्तसंस्था)
माझी आई ज्युलिया अँगविन फासे फेकण्यात आणि त्यावर क्रमांक लिहिताना फारच आळस करते. त्यामुळे प्रत्येक वेळी फासे फेकण्यासाठी मला पैसे देत होती. त्यामुळे मी हा व्यवसाय सुरू केला, असे मीराने आपल्या वेबसाईटवर लिहिले आहे.

Web Title: Making an 11-year-old daughter is an impenetrable password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.