मलाला करोडपती !, आत्मकथनातून बक्कळ कमाई
By admin | Published: July 1, 2016 05:15 AM2016-07-01T05:15:23+5:302016-07-01T05:15:23+5:30
तालिबानींशी केलेल्या संघर्षामुळे मलाला युसूफजईला सगळे जग ओळखते. आपले अनुभव कथन केलेल्या तिच्या ‘आय एम मलाला’ या पुस्तकालाही त्यामुळेच प्रचंड मागणी आहे.
लंडन : तालिबानींशी केलेल्या संघर्षामुळे मलाला युसूफजईला सगळे जग ओळखते. आपले अनुभव कथन केलेल्या तिच्या ‘आय एम मलाला’ या पुस्तकालाही त्यामुळेच प्रचंड मागणी आहे. अर्थात, या पुस्तकविक्रीतून आणि व्याख्यानाच्या मानधनातून मलाला व तिचे कुटुंबीय आज करोडपती झाले आहेत. या पुस्तकाच्या आतापर्यंत १८ लाख प्रति विकल्या गेल्या आहेत. मलाला युसूफजईला प्रत्येक व्याख्यानासाठीचे मानधन १ लाख १४ हजार पाऊंड एवढे मिळते. ‘आय एम मलाला’ या पुस्तकाच्या आतापर्यंत
१८ लाख प्रतिंची विक्री झाली आहे. एकट्या ब्रिटनमध्ये २ लाख ८७ हजार प्रती विकल्या गेल्या.
>पुस्तक अन् कंपनी
क्रिस्टिना लॅम्ब या महिला पत्रकाराने नोबेल विजेत्या मलालाचे हे अनुभव पुस्तकातून मांडले आहेत. १८ वर्षीय मलाला पाकिस्तानात तालिबानींच्या हल्ल्यात जखमी होते आणि त्यानंतरचा घटनाक्रम यात मांडण्यात आलेला आहे.स्वात घाटीतील हे थरारक अनुभव मलालाने शब्दबद्ध केले आहेत. सालारजाई लिमिटेडकडे या पुस्तकाचे अधिकार आहेत. या कंपनीला आॅगस्ट २०१५पर्यंत २२ लाख पाऊंड उत्पन्न मिळाले होते. यापैकी निव्वळ नफा ११ लाख पाऊंड एवढा आहे. मलालाचे वडील जियाउद्दीन युसूफजई आणि आई तूर पेकाई हे या कंपनीचे संयुक्त शेअरधारक आहेत.