मालामाल मंथली, भारतीय प्रवाशाला दुबईत 19 कोटींची लॉटरी लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 03:59 PM2019-06-04T15:59:52+5:302019-06-04T16:02:44+5:30
दुबई - आबुधाबी येथे एका प्रवासी भारतीयास चक्क 19 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. खलीज टाईम्सच्या बातमीनुसार संजय नाथ ...
दुबई - आबुधाबी येथे एका प्रवासी भारतीयास चक्क 19 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. खलीज टाईम्सच्या बातमीनुसार संजय नाथ आर यांना एक कोटी दिरहमची (27 लाख डॉलर, 19 कोटी रुपये) लॉटरी लागली आहे. संजय नाथ यांच्यासह इतर पाच भारतीय प्रवासीही बिग टिकेट आबुधाबी लॉटरीच्या पहिल्या 10 मध्ये विजेता ठरले आहेत.
आबुधाबी येथील प्रसिद्ध असलेल्या बिग टिकेट लॉटरीच्या या महिन्यातील लकी विजेत्यांमध्ये भारतीय नागरिकाने बाजी मारली आहे. बिग टिकेट आबुधाबी येथे बक्षीस म्हणून रोख रक्कम आणि अलिशान गाड्यांची भेट देणारा सर्वात मोठा मासिक लकी ड्रॉ आहे. आबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिटी टर्मिनल किंवा ऑनलाईन पद्धतीने या लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यात येते.
दरम्यान, मागील महिन्यात बिग टिकेट लॉटरीमध्ये शारजाह येथील रहिवासी मूळचे भारतीय असणारे शोजित के.एस. यांनी 1.5 कोटी दिरहम जिंकले होते.