मालदीवमध्ये सत्तांतर, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते सोलिह यांचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 03:13 AM2018-09-24T03:13:53+5:302018-09-24T03:14:11+5:30
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अनेक राजकीय उलथापालथींनंतर आज अखेर मालदीवमध्ये सत्तांतर झाले आहे.
माले (मालदीव) - गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अनेक राजकीय उलथापालथींनंतर आज अखेर मालदीवमध्ये सत्तांतर झाले आहे. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत वर्तमान राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना पराभवाचा धक्का देत अपक्ष उमेदवार इब्राहीम मोहम्मद सोलिह यांनी विजयाची नोंद केली आहे. सोलिह हे भारतासोबत दृढ संबंधांचे समर्थक असल्याने मालदीवमधील या निवडणुकीत सोलिह यांना मिळालेला विजय भारतासाठी सुचिन्ह मानला जात आहे.
Maldives opposition leader, Ibrahim Mohamed Solih wins upset poll victory, reports AFP quoting official results pic.twitter.com/pdmPDhp7hT
— ANI (@ANI) September 23, 2018
मिहारू डॉट.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार सोलिह यांना आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमधील 92 टक्के मतांपैकी 58.3
टक्के मते मिळाली आहेत. देशातील निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करणाऱ्या ट्रान्सपरेंसी मालदीव या स्वायत्त संस्थेने सोलिह यांनी निर्णायक मताधिक्याने विजय मिळवल्याचे म्हटले आहे. तसेच विजय मिळवल्यानंतर केलेल्या भाषणात सोलिह यांना हा आनंद, अपेक्षा आणि ऐतिहासिक क्षण असून, आता देशात शांततामय मार्गाने सत्ता हस्तांतरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Maldives' opposition leader Ibrahim Mohamed Solih claims victory in the presidential election
— ANI Digital (@ani_digital) September 23, 2018
Read @ANI story | https://t.co/YMDgJu5eBypic.twitter.com/1TEqQh801a