चक्क सह-संस्थापकाला मेल करून वन प्लस ५टी मागितला गिफ्ट म्हणून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 01:13 PM2017-11-24T13:13:37+5:302017-11-24T13:24:59+5:30
मुंबई : बहुप्रतिक्षित असलेला वनप्लस ५टी भारतात लॉन्च झाला आहे. मोबाईलची किंमत जास्त असली तरीही हा मोबाईल घेता यावा याकरता प्रत्येक मोबाईलप्रेमी प्रयत्न करतोय. पण एका पठ्ठ्याने वेगळीच शक्कल लढवलीय. वन प्लस टीचा चाहता म्हणून मोफत मोबाईल मिळणं हा नैसर्गिक अधिकार असल्याचं त्याचं म्हणणं आहे. असं सांगून हा मोबाईल गिफ्ट म्हणून देण्यात यावा अशी विनंती त्याने वनप्लसचे सह-संस्थापक कार्ल पी यांना इमेलद्वारे विनंती केली आहे.
Natural right 🤦♂️ pic.twitter.com/0HTuh2zAYu
— Carl Pei (@getpeid) November 18, 2017
कृष्णकुमार व्ही असं या तरुणाचं नाव असून त्याने त्या मेलमध्ये असं म्हटलं आहे की, ‘माझ्या वनप्लस या मोबाईलमध्ये रिबूटची समस्या झाली आहे. त्यामुळे तुमचं नवं मॉडेल मला गिफ्ट म्हणून मिळणं माझा नैसर्गिक अधिकार आहे.’ ही विनंती ऐकून कार्ल यांनाही हसू आवरलं नाही. त्यांनी त्वरीत या मेलचा स्क्रीन शॉर्ट काढून ट्विटरवर शेअर केला. ट्विटरवर ही पोस्ट शेअर होताच अनेकांनी यावर आपल्यालाही असा नैसर्गिक अधिकार असून मलाही हा फोन मोफत मिळायला हवा अशी कमेंट केलेली आहे.
आणखी वाचा - 'वन प्लस ५ टी'चे स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल !
चायनिज मॅन्यूफॅक्चरर असलेल्या वनप्लसची पहिली आवृत्ती २०१३ साली लॉन्च झाली होती. अल्पावधितच या कंपनीने जगभर स्वत:चं विश्व निर्माण केलं. भारतातही या कंपनीने आपले पाय रोवले आहेत. त्याचप्रमाणे नुकताच भारतात वनप्लस ५ टी हा मोबाईल लॉन्च झाला. भारतीयांकडे बार्गेनिंग पॉवर भारी आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत भाव कमी-जास्त केला जातो. ‘पुछने मे क्या जाता है’ अशीही भारतीयांची संस्कृती असल्याने एखादी गोष्ट आपल्याला कमी किंमतीत किंवा मोफत मिळतेय हे हमखास पाहीलं जातं. या पठ्ठ्यानेही नेमकं तेच केलं. आपला मेल पाहून कदाचित त्यांना आपल्याला मोफत मोबाईल द्यावासा वाटला तर आपली लॉटरीच लागेल, मग ‘पुछने मे क्या जाता है? पण सध्या त्याचा मेल ट्वीटवर हास्याचा विषय बनला आहे.
तंत्रज्ञानासंबंधित अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा
कार्ल पी यांनी केलेल्या या ट्वीटला अनेकांनी रिट्वीट केलं असून आपल्यालाही हा नैसर्गिक अधिकार असून आम्हालाही हा मोबाईल मोफत मिळावा अशी हास्यास्पद विनंती करण्यात आली आहे. एका पठ्ठ्याने तर चक्क ‘माझा वाढदिवस जवळ येत असून मलाही हा मोबाईल गिफ्ट करा, मी आयुष्यभर तुमचा फोटो माझ्या वॉलपेपरला लावून ठेवीन’ असं रिट्विट केलं आहे. कार्ल यांच्या या ट्वीटमुळे सगळ्याच नेटीझन्सनी हास्याची तोफ डागली आहे. असा मेल येणं हे काही पहिल्यांदाच झालंय अशातला भाग नाही. कृष्णकुमार याने याआधीही असा मेल केला होता, मात्र तेव्हा त्यांनी काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. मात्र त्याचा आत्मविश्वास बघता त्याने केलेल्या दुसऱ्या मेलला त्यांनी चांगलंच उत्तर दिलंय.
सौजन्य - www.india.com