कुत्र्यांचे सूप? उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी उत्तर कोरियात 'डॉग मीट'ला मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 12:12 PM2018-07-28T12:12:51+5:302018-07-28T12:17:06+5:30
कुत्रा माणसाला चावला तर ते विशेष नाही म्हटले जाते पण माणूस कुत्र्याला चावायला लागला तर? उत्तर कोरियात उन्हाळ्यामध्ये कुत्र्याच्या मांसाला मागणी वाढते.
प्योंगयांग- उन्हाळ्यात थोडा थंडावा मिळावा, शांत वाटावे यासाठी तुम्ही सरबतं, आईस्क्रीम खात असाल., मात्र उत्तर कोरियामध्ये मात्र कुत्र्याच्या मांसाचे सूप हेच उन्हाळ्याच्या त्रासावर उतारा म्हणून वापरलं जातं. केवळ प्राणीप्रेमी नव्हे सर्वच लोकांना हा प्रकार विचित्र आणि त्रासदायक वाटत असला तरी अनेक पौर्वात्य देशांमध्ये गेली अनेक शतके कुत्र्याचे मांस खाल्ले जाते.
उत्तर कोरियात सध्या उन्हाळा सुरु आहे. दररोज इतर पेयांप्रमाणे प्योंगयांगमधील रहिवाशांनी बिंग्सू हे पेय ढोसायला सुरुवात केली आहे. हे पेय कुत्र्याच्या मांसापासून तयार केले जाते. कुत्र्याच्या मांसापासून केले जाणारे बिंग्सू पेय प्योंगयांगच्या प्रत्येक रेस्टोरंटमध्ये मिळते. त्यामुळे कोरियन लोकांनी उन्हाळ्यात थोडा आराम मिळावा म्हणून एकामागोमाग एक बिंग्सूचे बाऊल संपविण्याचा धडाका लावला आहे.
उत्तर कोरियात कुत्र्याच्या मांसाला स्वीट मिट म्हणजेच गोड मांस असे म्हटले जाते. उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये हे एक पौष्टिक खाद्य समजले जाते. उन्हाळ्यात त्याच्या मांसाला मोठी मागणी असते. त्यामुळेच या दिवसांना डॉग डेज ऑफ समर असेही म्हटले जाते.
17 जुलै, 27 जुलै आणि 16 ऑगस्ट हे उत्तर कोरियातील या वर्षाचे सर्वात जास्त तापमानाचे दिवस असतील. यंदाच्या वर्षी पूर्व आशियामध्ये उच्च तापमानाची लाट असल्यामुळे उत्तर कोरियात कुत्र्यांच्या मांसाची मागणी वाढली आहे. उत्तर कोरियात वर्षभरात साधारणतः 20 लाख कुत्रे खाण्यासाठी मारले जातात असे सांगितले जाते.
16 lives saved from a Butcher
— SaveKoreanDogs (@NamiKim_DogsSK) July 19, 2018
"No dogs barked, adjusting so well already. I can see the dogs know they are saved and finding peace. What a joyful day! Jess Abella Gilroy is the hero of this rescue."#StopBoknal#SaveKoreanDogs
➡️https://t.co/tDvk2rooMnpic.twitter.com/73CXi8F9Q5
उत्तर कोरियातील रेस्टोरंटसमध्ये कुत्र्याच्या मासांचे डझनाहून अधिक पदार्थ मिळतात. खाण्यासाठी कुत्रे मारले जाऊ नयेत यासाठी काही संस्थांनी आंदोलने केली असून सेव्ह कोरिअन डॉग्स अशा हॅशटॅगने ट्वीटरवरही मोहीम चालवली जाते.