३६० आसनी विमानात 'तो' एकटाच; अवघ्या १८ हजारांत केलेल्या मुंबई-दुबई प्रवासाची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 03:26 PM2021-05-26T15:26:22+5:302021-05-26T16:24:24+5:30

इमिरेट्सच्या मुंबई-दुबई विमानात एकटाच प्रवासी; अविस्मरणीय अनुभवानं प्रवासी थक्क

Man flies solo from Mumbai to Dubai on 360 seater flight for Rs 18k | ३६० आसनी विमानात 'तो' एकटाच; अवघ्या १८ हजारांत केलेल्या मुंबई-दुबई प्रवासाची सर्वत्र चर्चा

३६० आसनी विमानात 'तो' एकटाच; अवघ्या १८ हजारांत केलेल्या मुंबई-दुबई प्रवासाची सर्वत्र चर्चा

googlenewsNext

मुंबई: कोरोनामुळे दररोज नव्या संकटांचा सामना करावा लागत आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना आता ब्लॅक फंगसची लागण होऊ लागली आहे. एका बाजूला कोरोनानं सगळ्यांची चिंता वाढवली असताना एका व्यक्तीला कोरोनामुळेच एक अविस्मरणीय अनुभव घेता आला. भावेश झवेरी नावाच्या व्यक्तीनं मुंबई ते दुबई प्रवास विमानानं केला. विशेष म्हणजे यावेळी विमानात प्रवासी म्हणून फक्त भावेश झवेरी होते. बाकी संपूर्ण विमान रिकामी होतं. 

'त्या' मेलेल्या मुलाला जिवंत करा! ग्रामस्थांनी चेटकिण समजून दोघींना बेदम मारले; कपडे फाडले

भावेश झवेरी यांनी दुबईच्या तिकिटासाठी १८ हजार रुपये मोजले. मात्र १८ हजारात विमानातून एकट्यानं प्रवास करण्याची संधी मिळेल असा विचार त्यांनी स्वप्नातही केला नव्हता. मात्र इमिरेट्सच्या बोईंग ७७७ या ३६० आसनी विमानातील ते एकमेव प्रवासी होते. 'मी विमानात पाऊल ठेवताच हवाई सुंदरींनी टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं,' असं भावेश झवेरींनी सांगितलं. मी आतापर्यंत २४० हून अधिक वेळा मुंबई-दुबई दरम्यान प्रवास केला. मात्र हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कुंभकर्णांचं गाव! येथील लोक आठवडाभर राहायचे झोपून, समोर आलं धक्कादायक कारण

भावेश यांनी विमान प्रवासादरम्यान कर्मचाऱ्यांसोबत कमांडरशीदेखील संवाद साधला. या कर्मचाऱ्यांनी त्यांना संपूर्ण विमानाची सफर घडवली. विमान प्रवासादरम्यान देण्यात येणाऱ्या सूचनादेखील विशेष होत्या. 'नेहमी विमानातील सर्व प्रवाशांना सूचना देण्यात येतात. मात्र या प्रवासावेळी माझ्यासाठीच सूचना दिल्या गेल्या आणि त्या विशेष होत्या. मिस्टर झवेरी तुमचा सीटबेल्ट बांधा. मिस्टर झवेरी आपण लँड होतोय, अशा सूचना विमानात ऐकू आल्या. हा अनुभव थक्क करणारा होता,' असं भावेश यांनी सांगितलं.

भावेश गेल्या २० वर्षांपासून दुबईचे रहिवासी आहेत. कोरोनाच्या संकटामुळे संयुक्त अरब अमिरातीनं विमान प्रवासावर निर्बंध लादले आहेत. त्यानुसार दुबईचे नागरिक, गोल्डन व्हिसा असलेले नागरिक आणि राजदूतांनाच दुबईत येण्याची परवानगी आहे. सर्वसामान्यांना दुबईत प्रवेश नाही. त्यामुळे भावेश झवेरी दुबईला जाणाऱ्या विमानात एकटेच होते.

Web Title: Man flies solo from Mumbai to Dubai on 360 seater flight for Rs 18k

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.