विमानात हरवलं वॉलेट, सरप्राइज गिफ्टबरोबर मिळालं परत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 07:38 PM2018-11-28T19:38:37+5:302018-11-28T19:50:44+5:30

अशीच घटना अमेरिकेतल्या हंटर शमेटबरोबरच घडली आहे.

man found his lost wallet with surprise gift | विमानात हरवलं वॉलेट, सरप्राइज गिफ्टबरोबर मिळालं परत

विमानात हरवलं वॉलेट, सरप्राइज गिफ्टबरोबर मिळालं परत

वॉशिंग्टन- डिजिटल माध्यमाच्या युगात पेनानं पेपरवर लिहून पत्र पाठवण्याची पद्धत काहीशी कालबाह्य झाली आहे. त्यामुळे असं एखादं पत्र आपल्याला मिळाल्यास त्याचं फारच अप्रूप वाटतं. हातानं लिहिलेल्या पत्रातून आपल्याला आपुलकीची जाणीव होते. अशीच घटना अमेरिकेतल्या हंटर शमेटबरोबरच घडली आहे. खरं तर हंटर यांचं वॉलेट विमानात हरवलं होतं. त्यांना ते एका सरप्राइज गिफ्टबरोबर परत मिळालं आहे.

हंटर काही दिवसांपूर्वी बहिणीच्या लग्नाकरिता लास वेगासला गेले होते. त्याच वेळी प्रवासात त्यांचं वॉलेट हरवल्याचं त्यांना समजलं. हंटर यांच्या आई जिनी शमेट यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट टाकली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, हंटरच्या हरवलेल्या वॉलेटमध्ये 60 डॉलर कॅश, 400 डॉलरचा एक पे-चेक, डेबिट कार्ड आणि आयडी कार्ड होतं. बहिणीचं लग्न असल्यानं त्यानं याबाबत जास्त विचार केला नाही आणि पालकांकडून पैसे उधारीवर घेतले आहेत.

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, हंटर हे वॉलेट हरवल्यानं फारच अडचणीच सापडले होते. त्यांना वाटलं त्यांचं वॉलेट कदाचित विमानात पडलं असावं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी याची माहिती फ्रँटियर विमान प्रशासनाला दिली. परंतु विमान कंपनीनं अशा कोणत्याही प्रकारचं वॉलेट मिळालं नाही, असं सांगितलं. बहिणीचं लग्न उरकून जेव्हा हंटर पुन्हा लास वेगासवरून स्वतःच्या घरी ओमाहा जात होते. त्यावेळी आयडी नसल्यानं त्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं. एका तास तपासणी आणि चौकशी केल्यानंतर त्यांना विमानानं प्रवास करण्याची परवानगी मिळाली.

हंटर सांगतात, जेव्हा ते ओमाहाला पोहोचले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना एक पार्सल मिळालं. या पार्सलमध्ये हंटरचं वॉलेटमध्ये असलेल्या सर्वसामानासह ठेवण्यात आलं होतं. त्याबरोबरच एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं की, मला तुमचं हे वॉलेट ओमाहाहून लास वेगासला जाणाऱ्या फ्रंटियर फ्लाइटच्या 12व्या लाइनच्या सीट एफ आणि दिवाळाच्या मध्ये मिळालं. मला वाटलं तुम्हाला याची गरज असेल, ऑल द बेस्ट. मी तुमच्या 60 डॉलर कॅशचे 100 डॉलर केले आहेत. जेणेकरून जेव्हा तुम्हाला वॉलेट मिळेल, तेव्हा तुम्ही आनंदानं पार्टी करू शकाल. वॉलेट पुन्हा मिळाल्यानं हंटरच्या कुटुंबीयांनीही त्या अज्ञात व्यक्तीचे फेसबुकवरून आभार मानले आहेत. हंटरच्या आईनं पुन्हा दुसरी फेसबुक पोस्ट लिहिलं आहे. जर आम्ही त्या व्यक्तीला शोधू शकलो, तर त्यांचे व्यक्तिगत स्वरूपात आभार मानू, त्यामुळे त्या व्यक्तीला शोधण्यासाठी मदत करण्याचं आवाहनही आईनं केलं आहे.

Web Title: man found his lost wallet with surprise gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.