आरंर! पठ्ठ्याचं नशीबचं वाईट, न केलेल्या गुन्ह्यासाठी झाली ५ वेळा अटक, कारण वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 06:11 PM2021-12-07T18:11:10+5:302021-12-07T18:12:13+5:30

चीनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसारखाच दिसणारा गुन्हेगार त्याच्याच आसपास कुठेतरी राहात होता. याचा मोठा फटका या निर्दोष व्यक्तीला बसला.

man jailed five times without any crimes but because of face resemblance | आरंर! पठ्ठ्याचं नशीबचं वाईट, न केलेल्या गुन्ह्यासाठी झाली ५ वेळा अटक, कारण वाचून बसेल धक्का

आरंर! पठ्ठ्याचं नशीबचं वाईट, न केलेल्या गुन्ह्यासाठी झाली ५ वेळा अटक, कारण वाचून बसेल धक्का

googlenewsNext

पृथ्वीर एकसारखे दिसणारे (Face Resemblance) तब्बल ५ लोक असतात असं म्हटलं जातं. फक्त आपल्याला हे माहिती नसतं की आपल्याप्रमाणेच दिसणारे हे लोक नेमके कुठे आहेत. मात्र, चीनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसारखाच दिसणारा गुन्हेगार त्याच्याच आसपास कुठेतरी राहात होता. याचा मोठा फटका या निर्दोष व्यक्तीला बसला.

चीनच्या जिलिन प्रोविंसमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसाठी एक संपूर्ण आठवडात इतका वाईट होता, की तो हे आयुष्यभर विसरणार नाही. अजब बाब ही आहे की यात त्या बिचाऱ्याची काहीही चूक नव्हती. मात्र, निसर्गानेच त्याच्यासोबत अशी चेष्टा केली की कोणताही गुन्हा केलेला नसताना त्याला जेलमध्ये जावं लागलं (Man Jailed 5 Times Without Any Crime) .

ऑक्टोबर २०२१ मध्ये ही अजब घटना घडली. जिलिन येथील पोलिसांनी एकाच व्यक्तीला तीन दिवसाच्या आत पाच वेळा अटक केली आणि सोडून दिलं. या व्यक्तीचा चेहरा परिसरातील गुन्हेगार ज्यू शियानजियान (Zhu Xianjian) याच्यासोबत मिळताजुळता होता. जो सध्या जेलमधून फरार आहे. अशात पोलिसांना त्याचा पत्ता देणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींनी पाचवेळा त्याच व्यक्तीचा पत्ता दिला, ज्याचा चेहरा गुन्हेगारासोबत जवळपास हुबेहूब मिळताजुळता होता.

फरार आरोपीचा पत्ता सांगणाऱ्या बक्षीस मिळणार होतं. त्यामुळे बक्षीसाठी सगळेच पोलिसांना गुन्हेगारासारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीचा पत्ता देत होते आणि पोलिसांनीही त्याला पाचवेळा अटक केली. ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, कोणताही गुन्हा नसताना पोलिसांनी या आरोपीला वारंवार शोधून पकडलं.

ज्यू शियानजियान तुरुंगातून पसार झाल्यावर त्याचे फोटो संपूर्ण परिसरात लावण्यात आले होते. या बिचाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यापासून त्याचा हेअरकटही हुबेहूब गुन्हेगार असलेल्या व्यक्तीसारखाच आहे. यामुळे पोलिसांचीही गफलत झाली. हा गोंधळ तेव्हापर्यंत सुरूच राहिला जोपर्यंत २८ नोव्हेंबरला खरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडला नाही. मात्र तोपर्यंत ही कथा सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनेलवर हीट झाली होती. लोकांनी निर्दोष व्यक्तीला सल्ला दिला की पुढच्या वेळी आयडी कार्ड गळ्यात घालूनच घराबाहेर पड, जेणेकरून लोकांचा गोंधळ उडणार नाही.

Web Title: man jailed five times without any crimes but because of face resemblance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.