खतरनाक! अचानक ११ वाघांसमोर घेतली माथेफिरू व्यक्तीने उडी, VIDEO बघा पुढे काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 05:28 PM2021-10-26T17:28:44+5:302021-10-26T17:33:32+5:30

ही व्यक्ती प्राणी संग्रहालयात फिरता फिरता अचानक वाघांच्या एका ग्रुपसमोर जाऊन उभा राहिला. काही पावलांच्या अंतरावर त्याच्यासमोर एक दोन नाही तर ११ वाघ उभे होते.

Man jumped in front of 11 tigers video viral from beijing zoo | खतरनाक! अचानक ११ वाघांसमोर घेतली माथेफिरू व्यक्तीने उडी, VIDEO बघा पुढे काय झालं...

खतरनाक! अचानक ११ वाघांसमोर घेतली माथेफिरू व्यक्तीने उडी, VIDEO बघा पुढे काय झालं...

googlenewsNext

चीनची राजधानी बीजिंगमधील एका प्राणी संग्रहालात एका व्यक्तीने असा काही कारनामा केला की, तिथे उपस्थित लोक हैराण झाले. ही व्यक्ती प्राणी संग्रहालयात फिरता फिरता अचानक वाघांच्या एका ग्रुपसमोर जाऊन उभा राहिला. काही पावलांच्या अंतरावर त्याच्यासमोर एक दोन नाही तर ११ वाघ उभे होते.

ही घटना आहे २१ ऑक्टोबरची. बीजिंगच्या एका प्राणी संग्रहालयात हा प्रकार घडला. इथे बरेच पर्यटक फिरायला आले होते. तेव्हाच एक माथेफिरू व्यक्ती पांढऱ्या वाघांच्या ग्रुपसमोर जाऊन स्टंट दाखवू लागला. अशात त्याचा हा कारनामा पाहून तिथे उपस्थित लोक हैराण झाले होते.

'द सन यूके'च्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीने प्राणी संग्रहालयात सेल्फ ड्रायव्हिंग टूरची सर्व्हिस घेतली होती. ज्यानुसार टुरिस्ट स्वत:च ड्रायव्हिंग करत फिरू शकतात. पण प्राणी संग्रहालयातील जीप ड्राइव्ह करता करता अचानक या व्यक्तीने पांढऱ्या वाघांसमोर गाडीतून उडी घेतली. 

वाघांसमोर तो कधी बसत होता तर कधी उभा राहत होता. प्राणी संग्रहालयातील लोकांना जेव्हा लक्षात आलं की, या व्यक्तीचा जीव धोक्यात आहे तर त्यांनी एक आयडिया केली. वाघांचं लक्ष भरकटवण्यासाठी स्टाफने त्यांच्याकडे खाण्याचे पदार्थ फेकू लागले. अशातच संधी मिळताच व्यक्तीही तिथून निघून आला.

काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. रिपोर्टनुसार, नंतर या माथेफिरू व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. तो ५६ वर्षांचा असून त्याचं नाव जियांग असल्याचं समजलं.
 

Web Title: Man jumped in front of 11 tigers video viral from beijing zoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.