प्रेयसीचे मांस शिजवून खाणारा आरोपी मनोरुग्ण असल्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 06:03 PM2017-10-30T18:03:07+5:302017-10-30T18:12:06+5:30
प्रेयसीची हत्या करून अवयव शिजवून खाल्ले, आरोपी मानसिकदृ्ष्ट्या असंतुलित असल्याचा न्यायालयाने दिला निर्णय
जेफरसोनविल्ले - इंडियानामधील या शहरात एका इसमाने आपल्या प्रेयसीची हत्या करून निर्घृणपणे मृतदेहाची विल्हेवाट लावली. हत्या करून या नराधमाने तिचा मेंदू, ह्रुदय आणि फुफ्फुसाचा काही भाग खाल्लासुध्दा. हा सगळा प्रकार सप्टेंबर २०१४मध्ये झाला होता. मात्र या प्रकरणाची नुकतीच सुनावणी झाली असून आरोपी मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी डॉक्टरांकडून त्याची अधिक तपासणी सुरू असून त्याचा दोष सिद्ध झाल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
टॅमी जो ब्लँटोन असं हत्या झालेल्या दुर्दैवी महिलेचं नाव असून जोसेफ ऑबरहँन्स्ले असं आरोपीचं नाव आहे. हे दोघेही हत्या होण्याआधी बरेच दिवस एकमेकांसोबत होते. ही हत्या झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. जोसेफ याने जेव्हा टॅमी जो यांची हत्या केली तेव्हा त्यांच्या कवटीतील मेंदू बाहेर काढण्यासाठी मृतदेहाला इलेक्ट्रीक शॉक देण्यात आला. अशाप्रकारे त्याने मेंदूची कवटी फोडली आणि त्यातील मेंदू बाहेर काढून खाऊ लागला. एवढंच नाही तर मेंदू बाहेर काढून त्याने शिजवला. ताटात घेऊन त्याने तो सामान्य मांसाप्रमाणे खाल्ला. तसंच त्याने त्यावर ताव मारल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.
हत्येचे सर्व पुरावे हाती असतानाही आरोपीने सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच त्याच्या वकिलांनी तो आरोग्यदृष्ट्या फिट नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात यावी,अशी मागणीही केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचं समोर आलं आहे.
याआधीही त्याने आपल्या प्रेयसीला मारण्याचा प्रयत्न केला होता, तर त्याने त्याच्या आईला व बहिणीलाही खूपवेळा मारहाण केली आहे. त्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडले असल्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार करून पुढील सुनावणीत त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
सौजन्य - www.thesun.co.uk