कोरोनामुळे रेस्टॉरंट बंद होणार; बिअर प्यायला आलेल्या ग्राहकानं दिली २ लाखांची टीप!

By मोरेश्वर येरम | Published: November 24, 2020 11:21 AM2020-11-24T11:21:59+5:302020-11-24T11:29:07+5:30

अमेरिकेतील 'नाइट टाउन' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये रविवारी हा प्रकार घडला.

man leaves 3000 dollars tip due to restaurant closes for covid 19 outbreak | कोरोनामुळे रेस्टॉरंट बंद होणार; बिअर प्यायला आलेल्या ग्राहकानं दिली २ लाखांची टीप!

कोरोनामुळे रेस्टॉरंट बंद होणार; बिअर प्यायला आलेल्या ग्राहकानं दिली २ लाखांची टीप!

googlenewsNext
ठळक मुद्देरेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांप्रती ग्राहकाकडून अनोख्या माणुसकीचं दर्शनअमेरिकेत कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागलायरेस्टॉरंट बंद होणार असल्याचं कळताच ग्राहकानं दिली २ लाखांची टीप

अमेरिकेसह संपूर्ण जगभरात आता कोरोना व्हायरने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाउनची नामुष्की ओढावताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोनाचा फैलाव वाढत असल्यानं एका रेस्टॉरंट मालकाने आपलं रेस्टॉरंट पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेतला. रेस्टॉरंटमध्ये बिअर प्यायला पोहोचलेल्या एका ग्राहकाला रेस्टॉरंट उद्यापासून बंद होणार असल्याची माहिती मिळाली. हा ग्राहक रेस्टॉरंटचा शेवटचा ग्राहक होता. त्यानं जाताना तब्बल ३ हजार डॉलरर्सची (२ लाख २२ हजार ५४० रु.) टीप रेस्टॉरंटच्या वेटर्सना दिली. ग्राहकाच्या या कृतीनं सर्वच आवाक झाले. 

अमेरिकेतील 'नाइट टाउन' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये रविवारी हा प्रकार घडला. रेस्टॉरंटचे मालक ब्रँडन रिंग यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर याबाबतची एक पोस्ट लिहून माहिती दिली. ''एका ग्राहकाने रेस्टॉरंटमध्ये येऊन बिअरची ऑर्डर दिली. त्यानंतर जेव्हा तो बिल देण्यासाठी काऊंटरवर आला तेव्हा बिलाचे ७ डॉलर त्यानं दिले. रेस्टॉरंट उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंद करणार असल्याचं जेव्हा त्याला कळालं. तेव्हा या ग्राहकांना रेस्टॉरंटमधील सर्वांसाठी प्रार्थना केली. रेस्टॉरंटमधील चार वेटर्समध्ये टीप वाटून द्यावी असं त्यांन सांगितलं आणि तो निघून गेला'', असं रिंग म्हणाले. 

रिंग यांनी खाली पाहिलं तर तर टीप म्हणून त्यांन ३००० डॉलर्स ठेवल्याचं दिसलं. ते तात्काळ रिंग यांच्या मागे धावले. तेव्हा त्या ग्राहकानं रिंग यांना सांगितलं की, 'तुम्ही जेव्हा पुन्हा रेस्टॉरंट सुरू कराल तेव्हा आम्ही कोणतीही चूक करणार नाही'. इतकंच बोलून तो ग्राहक निघून गेला. 

तब्बल २ लाखांची टीप देणाऱ्या त्या ग्राहकाचं नाव जाहीर करणार नसल्याचं रिंग यांनी सांगितलं. रिंग यांच्या मते त्यांचं नाव जाहीर करणं हे कदाचित त्या ग्राहकाला आवडणार नाही. रेस्टॉरंटमधील कर्मचारी आणि वेटर्स प्रती त्या ग्राहकानं दाखवलेल्या माणुसकीबद्दल अतिशय आभारी असल्याचंही रिंग यांनी म्हटलंय.
  

Web Title: man leaves 3000 dollars tip due to restaurant closes for covid 19 outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.