ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांना 'वेगळ्या' नावांनी हाका मारायचा; नोकरी गेली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:54 AM2021-09-22T11:54:02+5:302021-09-22T11:55:34+5:30
Employee lost job: कंपनीने काढून टाकले म्हणून नाराज झालेल्या माईक हार्टलेने मँचेस्टर न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयात सुनावणी झाली.
ऑफिसमध्ये काम करताना महिला सहकाऱ्यांना (Female Employees) वेगवेगळ्या नावांनी हाक मारण्याची, मस्करी करण्याची सवय अनेकांना असते. परंतू अशा सवयीमुळे ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला आपली नोकरी गमवावी लागली आहे. हा व्यक्ती महिला सहकाऱ्यांना लव्ह, हनी, स्वीटी (Love, Honey, Sweetie) अशा नावांनी हाक मारायचा. त्याला कंपनीने काढून टाकले आहे. (man looses job while calling female co worker in office by Love, Honey, Sweetie names.)
या व्यक्तीने याविरोधात न्य़ायालयाचे दार ठोठावले. यामध्ये न्यायालयानेही कंपनीची बाजू घेतली. द सनच्या रिपोर्टनुसार मँचेस्टरमध्ये राहणारा माईक हार्टले हा ऑफिसमधील महिला सहकाऱ्यांना दुसऱ्या नावाने हाक मारायचा. या आधीही त्याची तक्रार महिलांनी केली होती. हनी, स्वीटी नावाने हाक मारत असल्याने त्याला कंपनीने काढून टाकले. यावर नाराज झालेल्या माईक हार्टलेने मँचेस्टर न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयात सुनावणी झाली.
जज पाऊलीन फीनी यांनी कंपनीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत अशा प्रकारे कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना हाका मारणे म्हणजे त्यांचा अपमान करणे आहे. अशा प्रकारच्या नावाने हाका मारणे चुकीचे आहे, असे म्हटले.
माईकच्या म्हणण्यानुसार तो महिलांनाच नाही तर पुरुष सहकाऱ्यांनाही वेगळ्या नावाने हाका मारायचा. महिलांना पेट नेम ने बोलविण्यामागे चुकीचा विचार नव्हता. यामुळे नोकरीवरून काढून टाकणे चुकीचे आहे.