मानसिक रुग्णानं प्रायव्हेट पार्टशी केला जीवघेणा प्रकार; दृश्य पाहून डॉक्टर्सही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 03:27 PM2021-10-01T15:27:11+5:302021-10-01T15:28:21+5:30

डॉक्टरांनी त्याच्या अवस्थेवर चिंता व्यक्त केली. प्रायव्हेट पार्ट प्लास्टिकमध्ये २ महिने अडकला होता.

Man private part stuck in plastic bottle for 2 months removed by knife | मानसिक रुग्णानं प्रायव्हेट पार्टशी केला जीवघेणा प्रकार; दृश्य पाहून डॉक्टर्सही झाले हैराण

मानसिक रुग्णानं प्रायव्हेट पार्टशी केला जीवघेणा प्रकार; दृश्य पाहून डॉक्टर्सही झाले हैराण

googlenewsNext
ठळक मुद्देयापूर्वीही त्याने प्लास्टिक बॉटलमध्ये प्रायव्हेट पार्ट टाकला होता. परंतु यावेळी बॉटलमध्ये त्याचा पार्ट अडकलानेपाळच्या या प्रकरणात व्यक्तीचं वय ४५ आहे. तो मानसिक तणावाखाली जीवन जगत होताबदनामीच्या भीतीपोटी त्याने २ महिने कुणालाही याची माहिती दिली नाही.

जगात अनेक प्रकारचे सनकी लोक आहेत, जे काही अजब-गजब प्रकार करतात त्यामुळे अनेकदा त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. काही असेही लोक आहेत जे शारिरीक सुखासाठी विचित्र प्रकार करतात. काही प्रकरणात तर लोकांच्या पोटात तर तारेपासून अनेक मॅग्नेट वस्तूही आढळतात. आता नेपाळमधून अजब-गजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका व्यक्तीनं प्लास्टिक बॉटलमध्ये स्वत:चा प्रायव्हेट पार्ट टाकलेल्या अवस्थेत डॉक्टरांकडे पोहचला. हे दृश्य पाहून डॉक्टरही हैराण झाले.

या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट एकदम सडला होता. डॉक्टरांनी त्याच्या अवस्थेवर चिंता व्यक्त केली. प्रायव्हेट पार्ट प्लास्टिकमध्ये २ महिने अडकला होता. त्यामुळे शरीराच्या त्या भागाला रक्त पुरवठा कमी झाला. हा व्यक्ती मानसिक रुग्ण आहे. त्याने डॉक्टरांना सांगितले की, यापूर्वीही त्याने प्लास्टिक बॉटलमध्ये प्रायव्हेट पार्ट टाकला होता. परंतु यावेळी बॉटलमध्ये त्याचा पार्ट अडकला. २ महिने ही गोष्ट त्याने इतरांपासून लपवून ठेवली. परंतु जेव्हा वेदना असहाय्य झाल्या तेव्हा मजबुरीने त्याला डॉक्टरांकडे यावं लागलं.

रिसर्चच्या स्टडीत प्रकरणाचा उल्लेख

मेडिकल एक्सपर्ट्सने या केसला इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस रिपोर्ट्समध्ये प्रकाशित केलं आहे. या स्टडीचं नाव Penis Strangulation with a plastic bottleneck असं ठेवलं आहे. या रिपोर्टचे लीड ऑथर नेपाळचे B.P Koirala Institute of Health Science चे दुर्गा नुपाने होते. त्यांनी स्वत:च्या स्टडीत सांगितले की, असे लोक जे मानसिक रुग्ण आहेत अथवा ज्यांना सेक्स रिलेटेड थ्रिल हवंय. तेच याप्रकारे अजबगजब वस्तू प्रायव्हेट पार्टमध्ये टाकतात. त्यासाठी मॅटेलिक किंवा नॉन मॅटेलिक वस्तूंचा वापर करतात. प्रायव्हेट पार्टमध्ये फसल्यानंतर सर्जरीच्या सहाय्याने ते काढलं जातं.

मानसिक तणावाखाली केले कृत्य

नेपाळच्या या प्रकरणात व्यक्तीचं वय ४५ आहे. तो मानसिक तणावाखाली जीवन जगत होता. याआधीही त्याने सेक्सयुअल प्लेजरसाठी प्रायव्हेट पार्टमध्ये बॉटल टाकत होता. यावेळी मात्र त्याने असं केले तेव्हा बॉटल प्रायव्हेट पार्टमध्येच अडकली. बदनामीच्या भीतीपोटी त्याने २ महिने कुणालाही याची माहिती दिली नाही. २ महिन्यानंतर त्याच्या शरीरातून उग्र वास येऊ लागला. रक्त पुरवठा ठिक होत नसल्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टला जखम होऊन ते सडायला लागलं होतं. डॉक्टर्सने सर्जरी करत त्याच्या शरीराचा भाग बाहेर काढला परंतु तो इतका सडला होता की ते कापावं लागलं. सर्जरीनंतर काही दिवसांनी रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केले.

Read in English

Web Title: Man private part stuck in plastic bottle for 2 months removed by knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर