सीक्रेट कॅमेरा लावून लेडीज टॉयलेटमधून रेकॉर्ड केले 60 व्हिडीओ, एक दिवस झाला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 09:20 AM2023-03-25T09:20:23+5:302023-03-25T09:20:46+5:30
एका माजी कर्मचाऱ्याने महिलांच्या टॉयलेटमध्ये स्पाय कॅमेरा फिट केला आणि 60 पेक्षा जास्त महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड केले.
Australian Embassy Bangkok: महिलांच्या टॉयलेट किंवा बाथरूममध्ये सीक्रेट कॅमेरा बसवून व्हिडीओ रेकॉर्ड केल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक खळबळजनक घटना नुकतीच घडली. बॅंकॉकमधील ऑस्ट्रेलियाच्या अॅम्बसीमध्ये ही घटना घडली. अॅम्बसीमध्ये काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याने महिलांच्या टॉयलेटमध्ये स्पाय कॅमेरा फिट केला आणि 60 पेक्षा जास्त महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड केले.
ही घटना थायलॅंडची राजधानी बॅंकॉकमध्ये घडली. ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील ऑस्ट्रेलियन अॅम्बसीच्या आयटी विभागात बऱ्याच वर्षापासून काम करत असलेल्या नयोत बॅंक थमसोंगसाना नावाच्या एका व्यक्तीने हे कृत्य केलं. आरोपी व्यक्तीने महिलांच्या टॉयलेट रूममध्ये एका कॅमेरा फिट केला होता. या कॅमेरातून 60 महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले.
काही महिलांच्या ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला. नंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली आणि नंतर आरोपी विरोधात केस दाखल झाली. असं सांगण्यात आलं की, जानेवारी 2022 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला नोकरीहून काढण्यात आलं होतं. जेव्हा चौकशी झाली तेव्हा त्याच्यावरील अनेक आरोप सिद्ध झाले आणि त्याला शिक्षा सुनावण्यात आली.
रिपोर्टनुसार, आरोपीला दोन वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण काही रिपोर्टमध्ये उल्लेख आहे की, या केसमध्ये त्याला आधी 4 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्याची शिक्षा कमी करून दोन वर्ष करण्यात आली. आरोपीला शिक्षा सुनावताना न्यायाधीश म्हणाले की, ही व्यक्ती समाजासाठी गंभीर धोका होता.