पोलिसांना धक्का मारून पळाला ड्रायव्हर, मागे लागले तर रेल्वे ट्रॅकवर सुसाट पळवली कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 07:47 PM2021-07-15T19:47:32+5:302021-07-15T19:51:10+5:30
पोलिसांनी जेव्हा चारचाकी चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर त्याने आधी रस्त्यावरील गाड्यांना धक्का आणि नंतर फरार झाला.
पोलिसांनी जेव्हा चारचाकी चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर त्याने आधी रस्त्यावरील गाड्यांना धक्का आणि नंतर फरार झाला. इतकंच नाही तर पोलिसांनी जेव्हा त्याचा पाठलाग केला तेव्हा त्याने रेल्वेच्या ट्रॅकवर गाडी पळवली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना हर्डफोर्डशायरमधील आहे. या घटनेत दोन पोलीसही जखमी झाले आहेत.
'द सन' मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या संपूर्ण घटना तेव्हा घडली जेव्हा एका महिला आणि एका पुरूष पोलीस अधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळी चेसहंट रेल्वे स्टेशनजवळ कार रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
जवळच्या घरातून शूट करण्यात आलेल्या फुटेजमध्ये महिला अधिकारी दिसत आहेत. ती एका हातात काठी घेऊन आहे आणि ओरडत आहे की, कारमधून बाहेर निघ. नंतर पुरूष अधिकारीही तेच म्हणताना ऐकायला मिळतो. पण ड्रायव्हर वेगाने गाडी रिव्हर्स घेतो.
कारचा दरवाजा उघडा असतानाच ड्रायव्हरने दोन्ही अधिकाऱ्यांनी मागे ढकललं. त्यानंतर ड्रायव्हरने कार मागे घेतली आणि वेगाने चालवू लागता. रेल्वे लाइन संपेपर्यंत या व्यक्तीने ट्रॅकवर कार चालवली. रेल्वेवरील फुटेजमध्ये दिसलं की, व्यक्तीने कार रेल्वे ट्रॅकवर चालवली. त्यानंतर कार तिथेच सोडून पळून गेला. त्यानंतर कमीत कमी १० पोलिसांच्या गाड्या, एक एम्बुलन्स घटनास्थळी पोहोचले होते.
या घटनेनंतर हर्टफोर्डशायर लंडनमधील काही रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झालं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना सुरूवातीला सूचना मिळाली की, एक चोरीची कार एसेक्सच्या काउंटीमध्ये आणली जात आहे. ड्रायव्हर या घटनेनंतर फरार झाला. पोलीस म्हणाले की, ड्रायव्हरचा शोध घेतला जात आहे.