'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 10:51 PM2020-05-18T22:51:03+5:302020-05-19T00:03:14+5:30
संबंधित युवकाच्या पत्नीनेच त्याला प्रपोज केले आणि नंतर त्यांचे लग्न झाले. संबंधित युवकाने सांगितले, की त्याने सर्वप्रथम इरा (पत्नी) सोबतच संभोग केला. मात्र, त्यांचा संभोग सामान्य नव्हता. तो अत्यंत वेदनादायक आणि आक्रमक होता.
कीव : साधारणपणे घरगुती हिंसाचाराच्या घटना महिलांच्या बाबतीत होत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, यूक्रेनमधील एका व्यक्तीने, आपल्या पत्नीनेच आपल्यावर तब्बल 10 वर्ष बलात्कार केल्याचा दावा केला आहे. त्याने सातत्याने मानसिक त्रासही दिल्याचे म्हटले आहे.
बीबीसी यूक्रेनने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, यूक्रेनमधील एका युवकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर आपली वेदनादायक कहाणी सांगितली. या युवकाने सांगितल्यानुसार, त्याला काही दिवसांपूर्वी, त्याची पत्नीच त्याच्यावर 10 वर्षांपासून बलात्कार करत असल्याची अनुभूती झाली. त्याच्या पत्नीनेच त्याला प्रपोज केले आणि नंतर त्यांचे लग्न झाले. त्यानंतर त्रास दिल्याचे म्हटले आहे.
CoronaVirus News: बापरे! कोरोनाचे नियम तोडले तर 'हा' मुस्लीम देश देणार जगातील सर्वात मोठी शिक्षा
विरोध केला तरीही पत्नी थांबली नाही -
संबंधित युवकाने सांगितले की, तो, अशा प्रकारच्या पत्नीच्या त्रासला होता. मात्र, विरोध करूनही ती थांबली नाही. त्याच वेळी त्याच्या मनात आले, की पुरुषांवरही बलात्कार होऊ शकतो. युवकाच्या मते, ऑफीसमधून घरी आल्यावर, त्याला आराम करावा वाटे. मात्र, ती त्याला संभोगासाठी आग्रह करत होती. त्याने अधिक विरोध केला तर ती त्याला मारहाण करायची. विकेंडच्या दिवशी तर या सर्व गोष्टींचा प्रचंड त्रास व्हायचा.
अशी मिळाली मदत -
या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, एका थेरपिस्टने त्याला मदत केली. थेरपी सेशनमध्ये त्याला आणि त्याची पत्नी इरा, यांना एक मेकांशी बोलावे लागे. यावेळी, जेव्हा तो बोलत असेल तेव्हा इराला त्याला टोकण्यास मनाई होती. याच सेशनमध्ये त्याने सर्वप्रथम त्याच्यावर होणाऱ्या अत्याचारांची वाच्चता केली होती. यावेळी इरा अत्यंत संतापली होती. यानंतर तिने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. त्यानेही सहमती दर्शवली. ज्यादिवशी त्याला घटस्फोटाचे कागद मिळाले तो त्याच्यासाठी सर्वात आंनंदाचा दिवस होता, असेही युवकाने म्हटले आहे.
आणखी वाचा -
CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!
जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप
CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा