विमान जळून राख झालं, मात्र तो वाचला; मग 10 दिवस जंगलात फिरत राहिला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 05:14 PM2022-07-08T17:14:35+5:302022-07-08T17:15:17+5:30
पावेल क्रिवोशापकिन An-2 प्लेन क्रॅशमध्ये गंभीरपणे जखमी झाला होता. त्यानंतर तो रशियातील जंगलात 10 दिवस एकटाच राहिला. त्याला गंभीर जखमा आल्या होत्या.
प्लॅन क्रॅशमध्ये जिवंत राहिलेल्या व्यक्तीला 10 दिवसांनंतर रेस्क्यू करण्यात आलं. चांदीचं खोदकाम करण्याऱ्या या व्यक्तीची जिवंत असण्याची कहाणी कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, पावेल क्रिवोशापकिन An-2 प्लेन क्रॅशमध्ये गंभीरपणे जखमी झाला होता. त्यानंतर तो रशियातील जंगलात 10 दिवस एकटाच राहिला. त्याला गंभीर जखमा आल्या होत्या.
10 दिवस त्याने केवळ नूडल्स खाऊन स्वत:ळा जिवंत ठेवलं. हे नूडल्स त्याला एका झोपडीत सापडले होते.
पावेल चांदी खोदून काढण्याचं काम करतो. 1 जुलैला तो रशियाच्या याकुतिया भागात बचाव दलाला सापडला. या भागात अस्वल आणि कोल्ह्यांचा आहे.
पावेल ज्या प्लेन क्रॅशमधून जिवंत वाचला त्या प्लेनचे पायलट आणि को-पायलट जिवंत जळाले होते. पावेलने सांगितलं की, तो वाचला कारण तो प्लेनच्या मागच्या भागात होता. या भागात 1 टनापेक्षा जास्त खाण्याचे पदार्थ आणि चांदीचं खनन करण्यासाठी उपकरण होते.
हॉस्पिटलमध्ये पावेलने सांगितलं की, जेव्हा तो शुध्दीवर आला तेव्हा त्याच्या चारही बाजूने केवळ धूर होता. प्लेन जळत होतं. तो साधारण तीन तास विमानाजवळच बसून राहिला. प्लेन जळून राख झालं. जेव्हा तो तिथून निघाला तेव्हा त्याला नदी किनारी एक झोपडी दिसली. तिथेच त्याला नूडल्सचे पॅकेटही मिळाले. तेच खाऊन तो 10 दिवस जगला.
पावेलने सांगितलं की, त्याने अनेकदा हेलिकॉप्टरचा आवाज ऐकला आणि त्यांना झेंडाही दाखवला. 10व्या दिवशी बचाव दलाच्या एका हेलिकॉप्टरला तो दिसला आणि आपल्यासोबत घेऊन आले. सर्वातआधी बचाव दलाला प्लेनचा मलबा दिसला, त्यानंतर पायलट आणि को-पायलटचे मृतेदह आणि त्याच्या एक तासांनंतर त्यांना पावेल दिसला.
रशियाच्या याकूतिया भागात जिथे पावेल सापडला तिथे तापमान हिवाळ्यात मायनस 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली येतं. उन्हाळ्यात इथे दिवसाचं तापमान 18 डिग्री सेल्सिअस असतं. जे रात्री 10 डिग्री होतं.