लोकांवर थुंकणारा ‘तो’ व्यक्ती कोरोना बाधितच, थायलंडच्या रेल्वेत आढळला मृत अवस्थेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 03:14 PM2020-04-03T15:14:41+5:302020-04-03T15:16:53+5:30
नन बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अननच्या मृतदेहाची तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे समजले. त्याने मृत्यूपूर्वी किती लोकांना कोरोनाची लागण व्हावी यासाठी प्रयत्न केले याचा शोध घेण्याचे आव्हान आता थायलंडमधील आरोग्य यंत्रणेसमोर आहे.
रेल्वे स्थानकावर तिकीट काढताना दुसऱ्या व्यक्तीवर थुंकणारा काही वेळाने मृत अवस्थेत आढळून आला. थायलंड येथील ही घटना असून अनन साहोह असं त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अननच्या हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासल्यानंतर तो दुसऱ्या व्यक्तीवर थुंकल्याचे समोर आले. यामुळे येथील आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली.
रेल्वेत बसण्यापूर्वी अनन साहोह हा व्यक्ती तिकीट खरेदीच्या लाईनमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर थुंकताना दिसून आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो थुंकताना दिसत आहे. आता रेल्वे कर्मचारी आणि आरोग्य विभाग मयत अनन ज्या व्यक्तीच्या तोंडावर थुंकला त्याचा शोध घेत आहेत. जेणेकरून त्या व्यक्तीमुळे आणखी कोणाला कोरोनाची लागण होऊ नये.
अनन यांच्याविषयी तपास केल्यानंतर समजले की, तो बॅकॉकहून नाराथिवाटला निघाला होता. तसेच तो काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानहून परतला होता. स्टेशनवर अनन यांचे तापमान देखील तपासण्यात आले होते. त्यात त्याच्या शरीराचे तापमान सामान्य होते. रेल्वेतून प्रवास करताना त्याला उलटी आणि खोकल्याचा त्रास झाला होता. त्यामुळे दुसऱ्या स्टेशनवर त्याचे तापमान तपासण्यात आले. मात्र तरी त्याच्या शरीराचे तापमान सामान्यच आढळून आले होते. त्यावेळी इतरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने ऐकले नाही.
दरम्यान काही वेळाने अनन रेल्वेत बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अननच्या मृतदेहाची तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे समजले. त्याने मृत्यूपूर्वी किती लोकांना कोरोनाची लागण व्हावी यासाठी प्रयत्न केले याचा शोध घेण्याचे आव्हान आता थायलंडमधील आरोग्य यंत्रणेसमोर आहे.