बापरे! पोटदुखीकडे दुर्लक्ष करणं पडलं चांगलंच महागात, 6 अवयव झाले खराब; तरुणाची मृत्यूशी झुंज 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 02:37 PM2022-07-20T14:37:55+5:302022-07-20T14:38:42+5:30

गेल्या दोन वर्षांपासून पोटदुखीमुळे त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे. वेदना वाढत गेल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचं इन्फेक्शन झालं.

man who needs six organ transplants to live 50 chance of survival | बापरे! पोटदुखीकडे दुर्लक्ष करणं पडलं चांगलंच महागात, 6 अवयव झाले खराब; तरुणाची मृत्यूशी झुंज 

बापरे! पोटदुखीकडे दुर्लक्ष करणं पडलं चांगलंच महागात, 6 अवयव झाले खराब; तरुणाची मृत्यूशी झुंज 

Next

पोटदुखीचा त्रास हा अनेकांना कधी ना कधी तरी होत असतो. पण अनेकदा अशा त्रासाकडे कामाच्या गडबडीत आपण लक्ष देत नाही. पण याकडे दुर्लक्ष करणं हे चांगलंच महागात पडू शकतं. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कॅनडामध्ये राहणाऱा 20 वर्षीय तरुण एका रहस्यमय आजाराने त्रस्त आहे. एरिक कॉलम कॅनडातील फोर्ट सेंट जॉनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतो. लहानपणापासूनच त्याच्या पोटात वेदना होत होत्या. पण या वेदना तो सहन करत होत्या. 

गेल्या दोन वर्षांपासून पोटदुखीमुळे त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे. वेदना वाढत गेल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचं इन्फेक्शन झालं. परिणामी त्याचं त्याचं छोटं आतडंही काढावं लागलं. त्याच्या लिव्हर आणि किडनीमध्ये समस्या निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याची प्रकृती खूप बिघडली आहे. एरिक नेमका काय आजार आहे, याबाबत डॉक्टरांनाही माहिती नाही. मिररच्या रिपोर्टनुसार, एरिक पोटाशी संबंधित असलेला रहस्यमयी आजार (mystery gastrointestinal condition) चा सामना करत आहे. 

एरिकला यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. पण त्याचं कुटुंब त्याला यासाठी खूप सपोर्ट करतं. एरिकने सांगितलं की, लिव्हर, किडनी आणि इतर इन्फेक्शनमुळे त्याचा 6 ऑर्गन ट्रान्सप्लांटची गरज आहे. आतापर्यंत कोणत्या रुग्णाचे 6 ऑर्गन ट्रान्सप्लांट झाले नाही आहेत. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणानंतरही त्याची वाचण्याची शक्यता 50 टक्के असेल, असं डॉक्टर म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: man who needs six organ transplants to live 50 chance of survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.