मंगळयानाचे काम व्यवस्थित सुरू

By admin | Published: September 13, 2014 02:12 AM2014-09-13T02:12:21+5:302014-09-13T02:12:21+5:30

मंगळ ग्रहाच्या अगदी जवळ पोहोचलेल्या भारताच्या मंगळयानाने आपले काम व्यवस्थित सुरू असल्याचा संदेश भारताला पाठवला आहे

The Mangalyaan work well | मंगळयानाचे काम व्यवस्थित सुरू

मंगळयानाचे काम व्यवस्थित सुरू

Next

नवी दिल्ली : मंगळ ग्रहाच्या अगदी जवळ पोहोचलेल्या भारताच्या मंगळयानाने आपले काम व्यवस्थित सुरू असल्याचा संदेश भारताला पाठवला आहे. येत्या २४ सप्टेंबर रोजी ते मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.
या यानाने पाठविलेल्या या संदेशात आपली सर्व यंत्रणा उत्तमरीतीने काम करीत असल्याचे म्हटले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) टिष्ट्वटरवर प्रसिद्ध केलेल्या एका नोंदीनुसार, हे मंगळयान इस्रोकडे नियमितरूपाने संदेश पाठवीत आहे. त्यांना टेलीमेट्री सिग्नल असे संबोधले जाते. शुक्रवारी मिळालेल्या या संदेशानुसार हे यान ठरल्याबरहुकूम काम करीत आहे.
या यानाने आपला ९५ टक्के प्रवास पूर्ण केला असून, मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी त्याला आपल्या तरल इंजिनाला पुन्हा सुरू करण्याचे आव्हानात्मक काम करावे लागणार आहे. हे इंजिन गेल्या दहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले होते. मंगळाच्या कक्षेत शिरण्यासाठी यानाला सध्याच्या असलेल्या २२ कि.मी. प्रति सेकंद या वेगाला कमी करून दीड कि.मी.प्रति सेकंद करणे गरजेचे आहे. इस्रोच्या मते, गरज पडल्यास १४ सप्टेंबरला मंगळयानाच्या दिशेला बदलले जाईल व नंतर १६ व १७ तारखांना मंगळग्रहाच्या कक्षेत शिरण्याचा सराव या यानाकडून करवून घेतला जाईल. या मोहिमेत २५० अभियंते सहभागी होणार आहेत. २१ सप्टेंबर रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत शिरण्यासाठी यानाला संबंधित आज्ञा दिल्या जातील व २२ रोजी त्याच्या तरल इंजिनाची चाचणी घेतली जाणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The Mangalyaan work well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.