कोण आहे ही मंजू बॅंगलोर? जिचा बिकीनी फोटो सोशल मीडियावर झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 02:49 PM2022-07-26T14:49:18+5:302022-07-26T14:54:44+5:30
Manju Bangalore Bikini : स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड फॅशन शो च्या स्विम विक दरम्यान इंडियन-अमेरिकन मंजू बंगलौरने कॅटवॉक केला. हा इव्हेंट अमेरिकेतील मियामीमध्ये झाला होता. दरवर्षी होणाऱ्या या इव्हेंटकडे जगभराच नजर असते.
Manju Bangalore Bikini : सध्या एका तरूणीच्या बिकीनी फोटोची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मंजू बंगलौर (Manju Bangalore ) असं तिचं नाव असून फिजिसिस्ट, लेखिका, अभिनेत्री, दोन नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशनची फाउंडर, मिस वर्ल्ड कॅलिफोर्निया 2019 आणि आता SI स्वीम रनवे मॉडल, 24 वर्षी मंजूने आपल्या मेहनतीने आपली ही ओळख तयार केली आहे. पहिली भारतीय महिला अॅस्ट्रोनॉट कल्पना चावला यांना आपला आदर्श मानणाऱ्या मंजूला 30 वयाच्या आधीच स्पेसमध्ये जायचं आहे.
स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड फॅशन शो च्या स्विम विक दरम्यान इंडियन-अमेरिकन मंजू बंगलौरने कॅटवॉक केला. हा इव्हेंट अमेरिकेतील मियामीमध्ये झाला होता. दरवर्षी होणाऱ्या या इव्हेंटकडे जगभराच नजर असते.
मंजूने नासाच्या एअरोस्पेस इंजिनिअरींगमध्ये इंटर्नशिप केली आहे. आता ती सायंटिस्ट-अॅस्ट्रोनॉट कॅंडिडेट प्रोग्रामचा भाग आहे. याद्वारे ती स्पेसमध्ये जाऊ शकते. यासाठी ती सतत ट्रेनिंग घेत आहे. रिकाम्या वेळेत ती तिच्या दोन संस्थांचं काम करते.
Operation Period ही संस्था तिने 2015 मध्ये सुरू केली होती. याद्वारे आतापर्यंत साधारण 2 लाख गरजूंना मेंस्ट्रुअल प्रॉडक्ट्स पुरवले. तेच Painting With Parkinson's ही संस्था तिने 2020 मध्ये सुरू केली. ही संस्था Parkinson आजाराने पीडित लोकांना फ्रीमध्ये पेंटिंग किट आणि आर्ट क्लास प्रोवाइड केले जातात. हा एक मानसिक आजार आहे.
around.uoregon.edu च्या रिपोर्टनुसार, मंजूचे आई-वडील मूळचे कर्नाटकचे राहणारे आहेत. 1960 मध्ये तिचे वडील फणी अमेरिकेत आले. त्यावेळी त्यांनी एका सीड रिसर्चची कंपनी सुरू केली होती. लग्नानंतर तिची आई गीताही अमेरिकेत आली होती.