अमेरिकेतही निघाला मराठा मोर्चा!

By admin | Published: October 18, 2016 05:53 AM2016-10-18T05:53:32+5:302016-10-18T05:53:32+5:30

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात निघणाऱ्या मराठा मूक क्रांती मोर्चांना विदेशातील सकल मराठा बांधवांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

Maratha Morcha went to America! | अमेरिकेतही निघाला मराठा मोर्चा!

अमेरिकेतही निघाला मराठा मोर्चा!

Next


न्यूयॉर्क - कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात निघणाऱ्या मराठा मूक क्रांती मोर्चांना विदेशातील सकल मराठा बांधवांनीही पाठिंबा दर्शविला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्स स्वेअर येथे रविवारी मराठा बांधवांनी मोर्चा काढला. अमेरिकेतील भारताच्या राजदूतांना निवेदन देण्यात आले तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे.
न्यूयॉर्कमधील छत्रपती फौंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात या मोर्चाला न्यूयॉर्क, न्यूजर्सी व कनेक्टीकट या अमेरिकेतील तीन राज्यांतील सकल मराठा समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. न्यूयॉर्कच्या शिल्पा जगताप, केशरी मुद्रस, माधुरी झिंजुर्डे,न्यूजर्सीच्या प्रियांका झगडे,आदिती भुतेकर, प्रियांका पाटील तर कनेक्टीकटच्या दीपाली बाबर व मनीषा बोथे या आठ मुलींनी निवेदन केले.

Web Title: Maratha Morcha went to America!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.