गांजा पिणारे किंवा बाळगणारे तुरुंगातून सुटणार; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 03:44 PM2022-10-07T15:44:38+5:302022-10-07T15:44:55+5:30
निवडणुकीपूर्वी जो बायडन यांनी अशा दोषींची शिक्षा माफ करण्याचे आश्वासन दिले होते.
Marijuana Laws in the US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी मारिजुआना किंवा भांग/गांजा संदर्भात मोठी घोषणा केली आहे. बायडन यांनी अल्प प्रमाणात गांजा बाळगणाऱ्या आणि तुरुंगात कैद असलेल्या सर्वांची शिक्षा माफ करण्याची घोषणा केली आहे. केवळ गांजा प्यायला किंवा बाळगल्यामुळे एखाद्याला तुरुंगात टाकणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
या निर्णयामुळे दोषी आढळलेल्या सुमारे 6,500 लोकांना फायदा होणार आहे. मारिजुआना बाळगल्याच्या गुन्ह्यासाठी सध्या कोणीही फेडरल तुरुंगात कैद नाही. बहुतांश शिक्षा राज्यस्तरावर होतात. आता या निर्णयामुळे त्या लोकांना नोकऱ्या, घरे आणि शिक्षण मिळणे सोपे होईल. तसेच, गांजा बाळगल्याबद्दल अनेकांना तुरुंगात टाकण्यात आले, यादरम्यान काहींचे जीवही गेले. त्यामुलेच हा निर्णय घेत असल्याचे बायडन म्हणाले. विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी बायडन अशा दोषींची शिक्षा माफ करण्याचे आश्वासन दिले होते.
सर्व राज्यपालांना माफी देण्याचे आवाहन करतील
डेमोक्रॅटिक अध्यक्ष म्हणाले की, ते सर्व राज्यांच्या राज्यपालांना मारिजुआना प्रकरणात दोषी असलेल्यांना माफी देण्याचे आवाहन करतील. बायडेन यांनी न्याय विभाग आणि आरोग्य विभागाला फेडरल कायद्यानुसार गांजाचे वर्गीकरण कसे केले जाते याचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही गांजाला हेरॉइनच्या समान मानतो आणि फेंटॅनाइलपेक्षा अधिक गंभीर मानतो, पण त्याला काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले.