ट्रुडो यांच्या जागी मार्क कार्नी बनले कॅनडाचे नवे पंतप्रधान; ट्रम्प यांचे टीकाकार राहिलेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 09:05 IST2025-03-10T09:03:38+5:302025-03-10T09:05:32+5:30
मार्क कार्नी कॅनडाचे नवे पंतप्रधान झाले आहेत.

ट्रुडो यांच्या जागी मार्क कार्नी बनले कॅनडाचे नवे पंतप्रधान; ट्रम्प यांचे टीकाकार राहिलेत
बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी यांची कॅनडाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. ५९ वर्षीय कार्नी यांना ८५.९ टक्के मते मिळाली आहेत. कॅनडाच्या वायव्य प्रदेशात जन्मलेले मार्क कार्नी यांनी त्यांचे बालपण एडमंटनमध्ये घालवले. त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि त्यानंतर १९९५ मध्ये अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली.
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'गोल्फ' प्रेम अन् 13 दिवसांत अमेरिकन करदात्यांचे 156 कोटी रुपये स्वाहा..!
२००८ मध्ये, त्यांची बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. २०१० मध्ये, जगप्रसिद्ध टाईम मासिकाने त्यांना जगातील २५ सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक म्हणून घोषित केले. याशिवाय, २०१२ मध्ये युरोमनी मासिकाने त्यांना 'सेंट्रल बँक गव्हर्नर ऑफ द इयर' म्हणून घोषित केले.
काही दिवसापूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान कृती आणि वित्त यावरील विशेष दूत यासारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी ब्रुकफील्ड अॅसेट मॅनेजमेंटमध्ये ट्रान्झिशन इन्व्हेस्टिंगचे पदही भूषवले आहे. २०१२ मध्येच तत्कालीन पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी त्यांना अर्थमंत्री होण्याची संधी दिली. पण त्यांनी हा प्रस्ताव नाकारला होता.
दरम्यान, जस्टिन ट्रूडो यांनी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, "मी सुरुवात करताना ज्या आशेने आणि कठोर परिश्रमाने लिबरल पक्षाचा नेता म्हणून निघत आहे." 'या पक्षाकडून आणि या देशाकडून खूप आशा आहेत. "लाखो कॅनेडियन लोक दररोज हे सिद्ध करतात की नेहमीच चांगले शक्य आहे." जानेवारीमध्येच ट्रुडो यांनी पक्षाला देशाचा नवीन पंतप्रधान निवडण्यास सांगितले होते.
मार्क कार्नी यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे आवडत नाहीत. त्यांनी अनेकनेळा ट्रम्प यांच्यावर टीका केल्या आहेत. कार्नी यांच्यासमोर आता अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे आणि देशातील लोकांचा विश्वास जिंकण्याचे आव्हान असेल.