मार्क झुकेरबर्ग पुन्हा बनणार ' बाबा'

By admin | Published: March 10, 2017 08:54 AM2017-03-10T08:54:37+5:302017-03-10T10:32:08+5:30

विख्यात सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग व त्याची पत्नी प्रिसिला चान पुन्हा आई-बाबा बनणार आहेत

Mark Zuckerberg to become 'Baba' again | मार्क झुकेरबर्ग पुन्हा बनणार ' बाबा'

मार्क झुकेरबर्ग पुन्हा बनणार ' बाबा'

Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १० - विख्यात सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग व त्याची पत्नी प्रिसिला चान पुन्हा आई-बाबा बनणार असून त्यांच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. कुद्द मार्कनेच फेसबूकवरून पोस्ट टाकत ही ' गुड न्यूज' शेअर केली आहे. ' प्रिसिला आणि मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आम्हाला लवकरच आणखी एक मुलगी होणार आहे. मॅक्सला छोटी बहीण मिळणार आहे' असे मार्कने त्याच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. 
‘प्रिसिला आणि मी खूप आनंदात आहोत. पुन्हा एकदा मुलगीच होईल, अशी आम्हा दोघांना अपेक्षा आहे,’ अशा शब्दांमध्ये मार्कने फेसबुकवर त्याच्या भावना व्यक्त केल्या. ‘मॅक्सच्यावेळी खूप वाईट अनुभव आला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा पालक होऊ, असे वाटले नव्हते. जेव्हा प्रिसिला पुन्हा गर्भवती असल्याचे समजले, तेव्हा बाळ सुदृढ असावे, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली. दुसरीदेखील मुलगीच व्हावी, ही आमची दुसरी अपेक्षा आहे, यामुळे मॅक्सला बहिण मिळेल,’ असे मार्कने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 
 

 
मार्क आणि प्रिसिला यांच्या पहिल्या मुलीचा, मॅक्सचा जन्म डिसेंबर २०१५ मध्ये झाला होता. विशेष म्हणजे मुलीच्या जन्माची आनंदाची बातमी शेअर करतानाच झुकेरबर्ग दांपत्याने फेसबूकचे ९९ टक्के शेअर्स दान करण्याचा निर्णयही जाहीर केला होता.  तसेच झुकेरबर्ग दाम्पत्याने त्यांच्या मुलीसाठी लिहीलेलं एक पत्रही फेसबूकवर शेअर केले होते. 'मॅक्स, आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्यासाठी आणि तुझ्यासारख्या असंख्य चिमुरड्यांसाठी हे जग सुखकर आणि आनंददायी बनवण्याची आमची जबाबदारीआहे. तू आम्हाला जो आनंद, प्रेम दिलंस तेच तुला भरभरुन लाभो अशा शुभेच्छा.’ असे सांगत मार्कने फेसबुकवर आपला आनंद व्यक्त केला. तसेच या सर्व काळात आपल्याला भरभरून शुभेच्छा व पाठिंबा देणा-यांचेही मार्कने मनापासून आभार मानले होते. 
(मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न, ९९% शेअर्स करणार दान)
(कोचीमधल्या तरुणासोबत मार्क झुकेरबर्गचा व्यवहार)
(फेसबूकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गचा मुस्लिमांना पाठिंबा)
(फेसबूकचा सीईओ मार्क झुकेरबर्गचे ट्विटर, पिंट्रेस्ट अकाऊंट झाले हॅक)
आता लवकरच त्यांच्या घरी आणखी एका छोट्या परीचे आगमन होणार असून सर्वांनी झुकेरबर्ग दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: Mark Zuckerberg to become 'Baba' again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.