Mark Zuckerberg: फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गनं गमावली अर्धी संपत्ती, राहतं घरही विकलं! कारण काय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 06:08 PM2022-07-26T18:08:36+5:302022-07-26T18:09:47+5:30

एक वेळ अशी होती की जगातील टॉप-३ श्रीमंत व्यक्तींच्या यादीत फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचा (Mark Zuckerberg) समावेश असायचा. पण सध्या झुकरबर्गचे वाईट दिवस सुरू आहेत.

mark zuckerberg lost half his fortune in 2022 sells house | Mark Zuckerberg: फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गनं गमावली अर्धी संपत्ती, राहतं घरही विकलं! कारण काय? वाचा...

Mark Zuckerberg: फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गनं गमावली अर्धी संपत्ती, राहतं घरही विकलं! कारण काय? वाचा...

googlenewsNext

नवी दिल्ली-

एक वेळ अशी होती की जगातील टॉप-३ श्रीमंत व्यक्तींच्या यादीत फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचा (Mark Zuckerberg) समावेश असायचा. पण सध्या झुकरबर्गचे वाईट दिवस सुरू आहेत. यंदाच्या वर्षात झुकरबर्गच्या नेटवर्थमध्ये तब्बल निम्म्याहून अधिक घसरण झाली आहे. आता झुकरबर्ग सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १७ व्या क्रमांकावर गेला आहे. यातच त्यानं सॅन फ्रान्सिस्कोमधील आपलं घर ३.१ कोटी डॉलरला (जवळपास २.४७ अब्ज रुपये) विकल आहे. यंदाच्या वर्षातील शहरातील सर्वाधिक किमतीला विकलं गेलेलं घर ठरलं आहे. झुकरबर्गनं नोव्हेंबर २०१२ मध्ये हे घर १ कोटी डॉलरला खरेदी केलं होतं. 

१९२८ साली उभारण्यात आलेली ही वास्तू ७ हजार स्वेअरफूट परिसरात पसरलेली आहे. फेसबुकनं जगात धुमाकूळ घालत कोट्यवधींची कमाई केल्यानंतर झुकरबर्गनं हे घर खरेदी केलं होतं. त्यानंतर २०१३ साली झुकरबर्गची पत्नी Priscilla Chan नं या घराच्या डागडुजीसाठी लाखो डॉलर खर्च केले होते. 

रिपोर्टनुसार, झुकरबर्गचं सिलिकॉन व्हॅली, लेक ताहो आणि हवाई येथेही घर आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार झुकरबर्गची नेटवर्थ आता ६१.९ अब्ज डॉलर इतकीच राहिली आहे. यंदाच्या वर्षात झुकरबर्गच्या नेटवर्थमध्ये तब्बल ६३.५ अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. म्हणजेच जवळपास ५०.६ टक्क्यांनी संपत्तीत घट झाली आहे. एकवेळ अशी होती की झुकरबर्ग  १४२ अब्ज डॉलरसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होते. अवघ्या वर्षभरापूर्वी झुकरबर्गनं जुलै २०२१ मध्ये हे स्थान प्राप्त केलं होतं. त्यावेळी फेसबुकच्या शेअरची किंमत ३५० डॉलरच्या जवळ पोहोचली होती आणि कंपनीचं मार्केट कॅप ९५० अब्ज डॉलर इतकं होतं. 

कारण काय?
मेटा कंपनीला आता टिकटॉक आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मकडून कडवी टक्कर मिळत आहे. युझर्स आता टिकटॉक आणि यूट्यूबकडे वळत आहेत. त्यामुळे कंपनीच्या मिळकतीवर मोठा परिणाम झाला आहे. यंदाच्या वर्षात कंपनीच्या शेअरमध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाली. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत फेसबुककडे २.९१ अब्ज मासिक अॅक्टीव्ह युझर्स होते. त्याआधीच्या तीन महिन्यांच्या आकडेवारीशी तुलना केल्यास काहीच फरक पाहायला मिळालेला नाही. आज फेसबुकच्या शेअरची किंमत १६६.६५ डॉलर अशी आहे. झुकरबर्गकडे मेटा प्लॅटफॉर्मचे जवळपास १६.८ टक्के शेअर्स आहेत. फेसबुकच्या एकूण मिळकतीपैकी ९७ टक्क्यांहून अधिकचा वाटा जाहिरातींचा आहे.

Web Title: mark zuckerberg lost half his fortune in 2022 sells house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.