JNU प्रकरणीच्या टिपण्णीवरून मार्टिना नवरातिलोवाची सारवासारव
By admin | Published: March 2, 2016 02:21 PM2016-03-02T14:21:04+5:302016-03-02T14:48:56+5:30
हिंसा आणि जोरजबरदस्तीनं काही साध्य होत नाही, एवढंच आपलं म्हणणं असल्याचं सांगत जेएनयू प्रकरणावरून निर्माण झालेला वाद शमवायचा प्रयत्न टेनीस लिजंड मार्टिना नवरातिलोवानं केला
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - हिंसा आणि जोरजबरदस्तीनं काही साध्य होत नाही, एवढंच आपलं म्हणणं असल्याचं सांगत जेएनयू प्रकरणावरून निर्माण झालेला वाद शमवायचा प्रयत्न टेनीस लिजंड मार्टिना नवरातिलोवानं केला आहे. जेएनयू प्रकरणी भाजपा सरकारवर टीका करणारा न्यू यॉर्क टाइम्समधला लेख ट्विट केल्यामुळे मार्टिनावर टीकेचा मारा झाला होता. या लेखात मोदी सरकारवर टिका करण्यात आली होती.
हा लेख मार्टिनानं टि्वट केल्यामुळे मोदीप्रेमींनी मार्टिनावर जोरदार हल्ला चढवला. या सगळ्या प्रकारादरम्यान, मार्टिनानं आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला तसेच टिकाकारांनाही उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.
अखेर, भारत मला किती आवडतो, मी असंख्यवेळा भारतात येऊन गेले आहे आणि भारतीय पद्धतीचं जेवणच मी खाते असं भारतप्रेम व्यक्त करताना मार्टिनानं हिंसा आणि जोरजबरदस्तीनं काही साध्य होत नाही एवढंच मला म्हणायचंय आणि कुठलीही बाजू घ्यायची नाहीये असं सांगत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीयांपेक्षा जास्त भारत मला कळतो असं म्हणायचं नाहीये, त्यामुळे मी त्यांना काही सल्ला देण्याचा प्रयत्न करत्येय असं समजू नका असंही तिनं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं आहे.
India’s Crackdown on Dissent, - is Pratap Bhanu Mehta right or wrong? Does he know what he is talking about? https://t.co/aMOfAWSti5
— Martina Navratilova (@Martina) February 23, 2016
What Passes for Sedition in India, -ultra nationalism easily turns into violence at worst, bullying at best. https://t.co/U5V6nvENFn
— Martina Navratilova (@Martina) February 22, 2016