पाकिस्तानमध्ये मरियम नवाज यांना एनएबीकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 03:17 PM2019-08-08T15:17:49+5:302019-08-08T15:21:17+5:30
मरियम शरीफ यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्तरदायित्व विभागाने (एनएबी) अटक केली आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्तरदायित्व विभागाने (एनएबी) अटक केल्याचे वृत्त येथील मीडियाने दिले आहे.
मरियम शरीफ यांना लाहोरमधून अटक करण्यात आल्याचे पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी सांगितले. तर, चौधरी शुगर मिल प्रकरणी मरियम शरीफ यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Maryam Nawaz, daughter of former Pakistan Prime Minister Nawaz Sharif has been arrested by National Accountability Bureau (NAB): Pakistan media (File pic) pic.twitter.com/WVGLSiWjW8
— ANI (@ANI) August 8, 2019
दरम्यान, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. यावरुन मरियम नवाज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना टोला लगावला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करणार असल्याचे सांगून इम्रान खान यांना मूर्ख बनविले. भारत काय रणनिती आखत आहे, याचा अंदाज लागू शकला नाही, असे मरियम नवाज यांनी म्हटले होते.
(Jammu and Kashmir : पाकिस्तान सैरभैर, मंत्र्यांकडून भारताला युद्धाची धमकी)