26/11 चा मास्टरमाइंड मसूद अजहरनं घेतली तालिबानी नेत्याची भेट, भारताविरोधात कट रचत असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 10:13 PM2021-08-27T22:13:50+5:302021-08-27T22:15:06+5:30

Mullah Baradar and Masood Azhar: आता पाकिस्तानला अफगाणिस्तानात पाय पसरण्याची संधी मिळाली आहे.

Masooh Azhar meets Taliban leader mulla baradar, suspected of plotting against India | 26/11 चा मास्टरमाइंड मसूद अजहरनं घेतली तालिबानी नेत्याची भेट, भारताविरोधात कट रचत असल्याचा संशय

26/11 चा मास्टरमाइंड मसूद अजहरनं घेतली तालिबानी नेत्याची भेट, भारताविरोधात कट रचत असल्याचा संशय

googlenewsNext

काबुल:अफगाणिस्तानावरतालिबाननं ताबा मिळवल्यानंतर भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तालिबानच्या कब्जानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी मोठा अड्डा बनू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरनं तालिबानी नेता मुल्ला बरादरची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

भारताविरोधात रचत आहेत कट 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जैशचा म्होरक्या मसूद अजहरनं अफगाणिस्तानमधील कंधारमध्ये मुल्ला बरादरची भेट घेतली आहे. ही भेट 17 ते 19 ऑगस्टदरम्यान झाल्याची माहती आहे. या भेटीचं आयोजन ISI नं केलं होतं. मसूद अजहरनं अब्दुल राउफसोबत मुल्ला गनी बरादरची भेट घेतली. या भेटीत भारताविरोधात कारवाया करण्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पाकिस्तानला दहशत वाढवण्याची संधी
पाकिस्तानच्या पाठिंब्यानं तालिबाननं 15 ऑगस्ट रोजी राजधानी काबुलसह अफगाणिस्तानचा बहुतांश भाग काबीज केला. यादरम्यान, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी देश सोडून संयुक्त अरब अमिरातीमध्ये पळून गेले. परिस्थिती बिघडल्यानंतर भारतासह बहुतांश देशांनी अफगाणिस्तानातून आपले सर्व अधिकारी परत बोलावून घेतले. यानंतर आता पाकिस्तानला तिथे पाय पसरण्याची संधी मिळाली आहे.
 

 

Web Title: Masooh Azhar meets Taliban leader mulla baradar, suspected of plotting against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.