इथिओपियामध्ये भीषण नरसंहार, 320 जणांचा मृत्यू; ओरोमो लिबरेशन आर्मीचा हात असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 06:11 PM2022-06-21T18:11:32+5:302022-06-21T18:14:39+5:30
इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी, ओरोमियात झालेला हल्ला 'भयानक कृत्य' असल्याचे म्हणत हल्याचा निषेध केला आहे.
इथिओपियाच्या पश्चिम ओरोमिया भागात शस्त्रधाऱ्यांनी 18 जून रोजी हल्ला केला होता. नव्या साक्षिदारांनी म्हटल्यानुसर, या हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला असून, तो तब्बल 320 वर पोहोचला आहे. इथिओपियातील हा सर्वात मोठा नरसंहार असल्याचे बोलले जात आहे. हा हल्ला नोव्हेंबर 2020 मध्ये सुरू झालेल्या टिगरेच्या उत्तरेकडील भागांतील एका संघर्षाशी संबंधित होता का, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे संकेत मिळालेले नाहीत. यामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनेचे वर्णन करणाऱ्या दोन लोकांनी म्हटल्यानुसार, पीडित अम्हार वंशाचे होते. जे या भागातील अल्पसंख्यक होते.
भयानक कृत्य -
इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी, ओरोमियात झालेला हल्ला 'भयानक कृत्य' असल्याचे म्हणत हल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, निर्दोष नागरिकांवरील हल्ले, तसेच अवैध आणि अनियंत्रित शक्तींकडून उपजीविका नष्ट करणे अस्वीकार्य आहे.
ओरोमो वांशाचे लोक राजकीयदृष्ट्या उपेक्षित?
इथिओपियातील ओरोमियामधील सर्वात मोठा समुदाय ओरोमो सोबतच इतर जातीचे काही समूह राजकीय दृष्ट्या उपेक्षित आहेत. तसेच त्यांचे केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपेक्षेमुळे मोठे नुकसान झाले आहे. अबी हे ओरोमो आणि इथिओपियाचे पहिलेच पंतप्रधान आहेत. मात्र, काही ओरोमोसनी म्हटले आहे, की त्यांनी समाजाच्या हितांकडे दूर्लक्ष केले आहे.
ओरोमो लिबरेशन आर्मी दोषी?
ही घटना ओरोमियाच्या पश्चिमेकडील व्होलेगाच्या गिंबी भागात घडली. एकाने म्हटल्यानुसार, 260 लोक मारले गेले होते. तर दुसऱ्याने म्हटले आहे, की 320 लोक होते. येथील नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपले नाव सांगण्यास नकार दिला आहे. ओरोमिया भागातील सरकारने एका निवेदनात ओरोमो लिबरेशन आर्मीला दोषी ठरवले आहे.