सीरियात कारमध्ये भीषण स्फोट, १९ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 18:16 IST2025-02-03T18:02:33+5:302025-02-03T18:16:06+5:30

उत्तर सीरियामधून पुन्हा एकदा कार स्फोटाची बातमी समोर आली आहे. या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

Massive car explosion in Syria, 19 killed, 12 seriously injured | सीरियात कारमध्ये भीषण स्फोट, १९ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

सीरियात कारमध्ये भीषण स्फोट, १९ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

उत्तर सीरियामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटमध्ये १९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १२ जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 

या स्फोटात १२ जणांहून अधिकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मनबिज शहराच्या बाहेरील भागात बहुतेक महिला कृषी कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाशेजारी कार बॉम्बचा स्फोट झाला.

मिळालेल्या माहितीनुसार,  मृतांमध्ये १८ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. स्थानिक सीरियन सिव्हिल डिफेन्सच्या मते, इतर १५ महिला जखमी झाल्या आहेत, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.

या स्फोटाची जबाबदारी अजूनही कोणी स्विकारलेली नाही. असे स्फोट याआधी सातवेळा झाले आहेत.  डिसेंबरच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना सत्तेवरून बाजूला करणाऱ्या एका विद्रोहावेळी या गटांनी एसडीएफकडून शहर ताब्यात घेतले. स्फोट झालेली कार रस्त्याच्या कडेला उभी होती. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे रहिवाशांना अधिक सतर्क राहावे लागले आहे.

मनबिजमधील रहिवाशांकडून काही भागात सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचे तसेच शहराच्या मुख्य भागात पाळत ठेवणारे कॅमेरे बसवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असं एका नागरिकाने सांगितले. 
 

 

Web Title: Massive car explosion in Syria, 19 killed, 12 seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.