नेपाळमध्ये मध्यरात्रीच मोठा भूकंप, 128 जणांचा मृत्यू; उत्तर भारतही हादरला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 06:13 AM2023-11-04T06:13:24+5:302023-11-04T07:02:42+5:30

नेपाळच्या उत्तरी-पश्चिम जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री हे भूकंपाचे धक्के जाणवले.

Massive earthquake in Nepal western area jajarkot, ६९ dead; North India was also shaken | नेपाळमध्ये मध्यरात्रीच मोठा भूकंप, 128 जणांचा मृत्यू; उत्तर भारतही हादरला

नेपाळमध्ये मध्यरात्रीच मोठा भूकंप, 128 जणांचा मृत्यू; उत्तर भारतही हादरला

भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये मध्यरात्री भूकंपाची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घनेत आत्तापर्यंत 128 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नेपाळमधीलभूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली असून या भूंकपाच्या धक्क्याने राजधानी दिल्लीतील एनसीआरला हादरा दिला आहे. उत्तर भारताच्या काही भागांतही या भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती आहे. या भूकंपात रुकूम पश्चिम जिल्ह्यात ३६ आणि जाजरकोट येथे २० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, जखमींची संख्याही मोठी असल्याचे समजते.

नेपाळच्या उत्तरी-पश्चिम जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री हे भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळच्या पीएमओ कार्यालयानेही ट्विट करुन नेपाळमधील भूकंपाची माहिती दिली. तसेच, घडलेल्या घटनेबाबत शोक व्यक्त करत संबंधित बचाव पथकांना घटनास्थळी पाठवल्यात आल्याचे सांगितले. नेपाळच्या जजरकोट येथील पश्चिम भागात हा शक्तीशाली भूकंप झाल्याचे पीएमओने सांगितले.  

दरम्यान, रुकुम जिल्ह्यातच ३६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, मृतांची संख्या 128 वर पोहोचली असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 

Web Title: Massive earthquake in Nepal western area jajarkot, ६९ dead; North India was also shaken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.