कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण आग; 8 जणांचा मृत्यू, तब्बल 5 लाख लोक झाले बेघर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:30 PM2020-09-11T12:30:50+5:302020-09-11T12:35:07+5:30
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
कॅलिफोर्नियाच्याजंगलात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 5 लाख लोक बेघर झाल्याची माहिती मिळत आहे. अत्यंत वेगाने ही आग पसरत असून आगीने रौद्र रूप धारण केलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचा सर्वाधिक फटका हा ओरेगनला बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
हवेमुळे ही आग वेगाने पसरत असून ओरेगनमध्ये हजारो लोकांची घरं जळाली आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास पाच लाखांहून अधिक लोक आगीमुळे बेघर झाले आहेत. या आगीमुळे आतापर्यंत सर्वाधिक नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं लाखो लोकांनी आपलं घर सोडून स्थलांतर केलं आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या ईशान्य पूर्वेतील प्लुमास नॅशनल फॉरेस्टमध्ये बुधवारी लागलेली ही आग एका दिवसात 40 किलोमीटरपर्यंत पसरली. काही तासांत 1,036 चौरस किलोमीटर क्षेत्राची राख झाली.
VIDEO: Californian firefighters battle wildfire under orange sky.
— AFP news agency (@AFP) September 11, 2020
Under a smokey orange sky, firefighters cut defensive lines to protect structures during the Bear fire in California. Entire communities have been razed as wildfires continue to rage in the western United States pic.twitter.com/UAmug5iDXX
कॅलिफोर्नियाच्याजंगलातील आगीत 2 दशलक्ष एकरवरील वनसंपदा भस्म
वेगाने पसरलेल्या आगीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. या आगीतून लोकांना बाहेर काढणंही कठीण होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कॅलिफोर्नियातील जंगलात भडकलेल्या आगीत 2 दशलक्ष हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली आहे. आणखी विध्वंसाची भीती लक्षात घेऊन अमेरिकी वन सेवा विभागाने दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्व आठ राष्ट्रीय वने बंद केली आहेत. कोरड्या उन्हाळ्यानंतर कॅलिफोनिर्यात पानगळतीचा हंगाम सुरू होतो. हा काळ आगींसाठी अधिक धोकादायक मानला जातो. राज्याच्या इतिहासातील तीन मोठ्या आगींपैकी दोन आगी सॅन फ्रान्सिस्को बे एरियात धुमसत आहेत.
आठ राष्ट्रीय वने बंद करण्याचा निर्णय
पॅसिफिक नैऋत्य विभागाच्या वन सेवा प्रादेशिक अधिकारी रँडी मूर यांनी आठ राष्ट्रीय वने बंद करण्याचा निर्णय घोषित केला. या निर्णयाचा रोजच्या रोज आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. सर्व राष्ट्रीय वनांतील कॅम्पग्राउंड्स बंद करण्यात आले आहेत. हवामानाची स्थिती वाईट असल्यामुळे आणखी नव्या ठिकाणी आग लागण्याचा धोका आहे. प्रत्येक आग विझविण्याची आमची क्षमता नाही, असे मूर यांनी सांगितले. कॅलिफोर्निया वने व आग संरक्षण विभागाचे प्रवक्ते लिन्ने टॉल्मॅकॉफ यांनी सांगितले की, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा काळ येथे आगीसाठी पोषक असतो. कारण सर्व गवत आणि वनस्पती वाळलेल्या असतात आणि वारा जोराचा असतो.
CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! चिंताजनक आकडेवारी आली समोरhttps://t.co/cI31v6e7y8#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) September 11, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही", आपचा भाजपावर हल्लाबोल
क्रूरतेचा कळस! वृद्ध काकाला भाच्याने जनावरांसोबत साखळीने बांधलं, अशी झाली अवस्था
CoronaVirus News : "कोरोना व्हायरस नष्ट झाला", भाजपा नेत्याचा अजब दावा
"उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील 'अयशस्वी' मुख्यमंत्री, त्यांनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं"