मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला मोठे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 06:49 PM2019-05-01T18:49:01+5:302019-05-01T19:07:55+5:30
भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे.
संयुक्त राष्ट्रे - भारतानेदहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या तसेच भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.
अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांमध्ये चीननं वारंवार खोडा घातला होता. त्यामुळे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात अडथळे येत होते. मात्र अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून नुकतेच देण्यात आले होते. त्यामुळे अखेर आज अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले. पाकिस्तानात लपून बसलेल्या अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
Syed Akbaruddin, India's Ambassador to the UN: Big, small, all join together. Masood Azhar designated as a terrorist in UN Sanctions list. pic.twitter.com/lVjgPQ9det
— ANI (@ANI) May 1, 2019
काश्मिरी तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण देणाऱ्या मसूद अझहरला अटक करण्यात आली होती. पुढे 1999 च्या कंदाहार विमान अपहरण नाट्यानंतर मसूद अझहरला भारत सरकारने मुक्त केले होते. त्यानंतर मसूद अझहरने पाकिस्तानात लपून भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते.
दरम्यान, मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात यावे यासाठी भारताकडून वारंवार प्रयत्न करण्यात येत होते. मात्र चीनच्या दबावामुळे मसूद अझहरला आंदरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे शक्य होत नव्हते.
National Disaster Response Force: Total of 47 flood rescue&relief teams have been prepositioned in 25 vulnerable/coastal areas of West Bengal,Odisha,Andhra,Tamil Nadu & Kerala to meet any eventuality arising due to cyclone. In addition, 24 teams are on alert standby at NDRF bases
— ANI (@ANI) May 1, 2019