मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 11:08 AM2024-11-16T11:08:35+5:302024-11-16T11:09:20+5:30

२६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात भारतात एकमेव दहशतवादी अजमल कसाब जिवंत सापडला होता. कसाबसह इतरांना ट्रेनिंग देणारा हा लखवीच होता.

Mastermind of 26/11 Mumbai attacks Zaki-ur-Rehman Lakhvi roams freely in Pakistan; Pakistan is misleading the world | मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय

मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय

एकीकडे ICC चॅम्पियस ट्रॉफीसाठी भारतानेपाकिस्तानात यावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे एक दहशतवादी उघड उघड शहरात फिरताना दिसून येतो. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड जकीउर रहमान लखवीचा नवा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा जगासमोर उघडा पडला आहे. गेली अनेक वर्ष भारत पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यांवरून जागतिक पातळीवर फटकारत आहे मात्र पाकिस्तानसारखा देश कधी सुधारण्याची शक्यता नाही.

व्हायरल व्हिडिओत जिम करणारा व्यक्ती कोण आहे याचा विचार केला तर तुम्हाला धक्का बसेल. पाकिस्तानातील हा कोण व्हिआयपी आहे जो फिटनेस ट्रेनरच्या देखरेखीत जिम करत आहे. तर हा व्यक्ती आहे २६/११ हल्ल्यातील मास्टरमाईंड जकी उर रहमान, हा मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि हँडलर आहे. जो पाकिस्तानातील जेलमध्ये असायला हवा होता परंतु तो अशाप्रकारे जिम करताना दिसून येत आहे. हा तोच लखवी आहे ज्याला पाकिस्तानी कोर्टने जगाच्या नजरेत जेलमध्ये पाठवले. परंतु लाहौर, रावलपिंडीमध्ये तो उघडपणे फिरतोय. संयुक्त राष्ट्र संघानेही त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो ज्याठिकाणी आढळला जिथे भारतीय क्रिकेट टीम मॅच खेळण्यासाठी जाणार होती. 

चॅम्पियस ट्रॉफीसाठी भारतीय टीमने पाकिस्तानात यावे असं त्यांना वाटत आहे मात्र आजही भारतातील निष्पाप लोकांचा जीव घेणारे दहशतवादी पाकिस्तानात उघड फिरतायेत. एकीकडे भारतीय टीमला पाकिस्तानात बोलावून पैसे कमवण्यासाठी त्यांची इच्छा आहे तर दुसरीकडे भारतात ज्याने हल्ला केला त्या दहशतवादी जकी उर रहमान लखवी याला व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात आहे. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात भारतात एकमेव दहशतवादी अजमल कसाब जिवंत सापडला होता. कसाबसह इतरांना ट्रेनिंग देणारा हा लखवीच होता. चाचू नावाने त्याला ओळखले जाते. मुंबईवरील हल्ल्याचा तपास करताना त्याचे षडयंत्र आणि १० दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिल्याचा लखवीवर आरोप आहे.

पाकिस्तानने लखवीला अटक केली होती परंतु एका कोर्टाने त्याला जामीन दिला. परंतु ४ वर्षाआधी पाकिस्तानातील आणखी एका कोर्टाने जकी उर रहमान लखवीला टेरर फंडिंगसाठी १५ वर्षाची शिक्षा सुनावली होती परंतु व्हायरल झालेले फोटो पाहिले तर ही शिक्षा केवळ जगाला दिखावा म्हणून देण्यात आली. आज तक या वृत्तवाहिनीने लखवीचा व्हिडिओ समोर आणला आहे.

Web Title: Mastermind of 26/11 Mumbai attacks Zaki-ur-Rehman Lakhvi roams freely in Pakistan; Pakistan is misleading the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.