जुळ्यांची जन्मतारीख वेगवेगळ्या वर्षात
By admin | Published: January 4, 2016 02:51 AM2016-01-04T02:51:26+5:302016-01-04T02:51:26+5:30
कॅलिफोर्नियात एका महिलेने ३१ डिसेंबरच्या रात्री जन्म दिलेल्या जुळ्यांची जन्मतारीख तशी एकच असायला हवी; पण इथे मात्र जन्मतारखेत चक्क वर्षभराचे अंतर आहे.
सॅन दिएगो : कॅलिफोर्नियात एका महिलेने ३१ डिसेंबरच्या रात्री जन्म दिलेल्या जुळ्यांची जन्मतारीख तशी एकच असायला हवी; पण इथे मात्र जन्मतारखेत चक्क वर्षभराचे अंतर आहे.
हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल; पण ही वस्तुस्थिती आहे. त्याचे झाले असे की, मॅरिबल व्हॅलेंसिया यांना ३१ रोजी सॅन दिएगो येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पहिल्या मुलीचा जन्म रात्री ११.५९ वाजता झाला; तर मुलाचा जन्म १२.०१ वाजता झाला.
अर्थात १२ वाजेनंतर वर्ष बदलले गेल्याने मुलीचा जन्म ३१ डिसेंबर २०१५ रोजीचा तर मुलाचा जन्म १ जानेवारी २०१६ रोजीचा आहे. मात्र, दोघांच्या जन्मवेळेत अंतर फक्त दोन मिनिटांचे आहे. आमच्यासाठी ही नवीन वर्षाची भेट असल्याची प्रतिक्रिया या मुलांचे वडील लुईस यांनी दिली आहे.