गणिताच्या शिक्षिकेने आपल्याच तीन विद्यार्थ्यांसोबत केला सेक्स
By Admin | Published: June 13, 2017 08:33 PM2017-06-13T20:33:02+5:302017-06-13T20:33:02+5:30
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पवित्र असते असे म्हटले जाते. मात्र या नात्याला कलंकित करणाऱ्या घटना अधूनमधून घडत
ऑनलाइन लोकमत
नॉर्थ कॅरोलिना, दि. 13 - शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पवित्र असते असे म्हटले जाते. मात्र या नात्याला कलंकित करणाऱ्या घटना अधूनमधून घडत असतात. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. गणित शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने आपल्याच तीन विद्यार्थ्यांसोबत सेक्स केल्याचे प्रकरण अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना उघडकीस आले आहे. या घटने प्रकरणी रॉकी माऊंट स्कूलमध्ये शिकवणारी शिक्षिका एरिन मॅकऑलिफ हिच्याविरोधात शाळेतील कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर या शिक्षिकेला अटक केली आहे.
या प्रकरणात आरोपी असलेली महिला शिक्षिका एरिन मॅकऑलिफ हिने 17 वर्षांच्या दोन आणि 16 वर्षांच्या एका विद्यार्थ्यासोबत सेक्स केल्याचे समोर आले होते. मात्र ही घटना घडल्यानंतर सदर शिक्षिकेने मे महिन्यांमध्येच नोकरी सोडली होती. दकम्यान पोलिसांनी शाळेच्या कर्मचाऱ्यांशी केलेल्या चौकशीत हे प्रकरण शाळेच्या परिसराबाहेरचे असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, या प्रकरणाता आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी शाळेच्यावतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रकरणी शाळेचे कर्मचारी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहेत. मॅकऑलिफ हिच्यावर एका विद्यार्थ्यासोबत तीन वेळा सेक्स केल्याचा तसेच अन्य दोघांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.