२०४० मध्ये कदाचित प्यायलाही पाणी नसेल; अभ्यास गटांनी सांगितला पुढचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 05:25 AM2022-03-26T05:25:36+5:302022-03-26T05:27:48+5:30
२०४० पर्यंत सुमारे ४४ देशांत अतिभीषण ते भीषण स्वरूपाची पाणीटंचाई जाणवेल, असे अभ्यास गटांचे निरीक्षण आहे.
सतत फुगणारी लोकसंख्या, वाढते नागरीकरण, शहरांची भरमसाठ वाढ आणि हवामान बदल या कारणांमुळे जगभरातील पाण्याच्या साठ्यांवर पडणारा ताण वाढत असून, भूजल पातळीच्या बाबतीत आपण जबाबदारीने वागलो नाही, तर २०४० पर्यंत जगाच्या काही भागात प्यायलाही पाणी नाही अशी परिस्थिती ओढवू शकते. २०४० पर्यंत सुमारे ४४ देशांत अतिभीषण ते भीषण स्वरूपाची पाणीटंचाई जाणवेल, असे अभ्यास गटांचे निरीक्षण आहे. हवामान बदलामुळे समुद्र पातळी वाढत राहिली तर समुद्राचे खारे पाणी घुसून पिण्यायोग्य भूजलाची प्रत पूर्ण खालावेल अशीही भीती आहे.