95 वेळा रिजेक्शन, नोकरीसाठी रस्त्यावर 5 दिवस Resume घेऊन उभा राहिला MBA तरुण अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 06:28 PM2022-10-24T18:28:12+5:302022-10-24T18:39:04+5:30

बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्याने 95 कंपन्यांमध्ये अर्ज केला. पण, या सर्व ठिकाणांहून त्याला नकार मिळाला. मग त्याने स्वत:ला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढून जाहिरात करण्याचा विचार केला.

mba graduate got rejection 95 times then stand on road with resume got job in 5 days | 95 वेळा रिजेक्शन, नोकरीसाठी रस्त्यावर 5 दिवस Resume घेऊन उभा राहिला MBA तरुण अखेर...

फोटो - आजतक

googlenewsNext

एमबीए पदवी घेतलेला तरुण आपला Resume घेऊन रस्त्यावर उभा राहिला आणि पाच दिवसांत त्याला नोकरीची ऑफर मिळाली. या तरुणाला यापूर्वी नोकरीसाठी 95 वेळा नकार ऐकावा लागला आहे. या तरुणाची कहाणी सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे. नोव्हेंबरमध्ये हा तरुण त्याची नवीन नोकरी सुरू करणार आहे. मोहम्मद अरहम शहजाद लंडनच्या रस्त्यावर Resume, सुटकेस, लिंक्डइन क्यूआर कोड घेऊन उभा होता. तो पाकिस्तानचा रहिवासी आहे. शहजाद एक वर्षापासून लंडनमध्ये नोकरीच्या शोधात होता. पण, त्याला यश मिळाले नाही.

बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्याने 95 कंपन्यांमध्ये अर्ज केला. पण, या सर्व ठिकाणांहून त्याला नकार मिळाला. मग त्याने स्वत:ला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढून जाहिरात करण्याचा विचार केला. यानंतर तो लंडनच्या रस्त्यावर उतरला. तो सुटकेस आणि लिंक्डइन क्यूआर कोड घेऊन रस्त्यावर उभा राहिला. शहजादने बिझनेस इनसाइडरला सांगितले, मी रोज नकारांना तोंड देऊन थकलो होतो. प्रत्येक दिवस माझ्यासाठी तणावपूर्ण बनला होता. त्यानंतर मी वेगळा प्रयत्न करण्याचा विचार केला.

11 जुलैला त्याने सकाळी लवकर उठून एक बोर्ड बनवला आणि त्यावर लिंक्डइन क्यूआर कोड पेस्ट केला. मग तो आपली सुटकेस आणि बोर्ड घेऊन तो तिथे हसतमुखाने उभा राहिला, पण त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला नाही. संध्याकाळी शहजाद निघाला तेव्हा त्याला दिसले की 200 लोकांनी त्याला अप्रोच केलं होतं. त्याला मिळालेला प्रतिसाद खूपच आश्चर्यकारक होता. शहजादने सांगितले की, काही लोक माझ्या जवळ आले आणि थांबले. त्यांनी लिंक्डइनचा क्यूआर कोड स्कॅन केला, माझा फोटो क्लिक केला आणि पुढे निघून गेले.

जेपी मॉर्गनचे संचालकही त्याच्याजवळ आल्या आणि त्यांनी त्यांचे बिझनेस कार्ड शहजादला दिले. शहजादने सांगितले की, यानंतर त्यांचा मेसेज आला आणि त्यांनी सांगितले की, मी तुमचा Resume त्याच्या ऑफिसच्या परिसरात सर्क्युलेट केला आहे. एक क्षण असाही होता, जेव्हा एक शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी शहजादपर्यंत पोहोचले आणि त्यांनी ग्रुप फोटो क्लिक केला. शहजाद रस्त्यावर उभा असताना एक व्यक्ती त्याच्याजवळ आली आणि त्यांनी सांगितले की, तो जे काही करत आहे ते बरोबर नाही. शहजादच्या म्हणण्यानुसार, ही एकमेव नकारात्मक कमेंट त्याला ऐकायला मिळाली.

रस्त्यावर उभं राहून केलेल्या मेहनतीचे अखेर पाच दिवसांनी त्याला फळ मिळालं. त्याला डेटा एनालिस्टची नोकरी मिळाली. शहजादने बिझनेस इनसाइडरला सांगितले की, हे त्याच्यासाठी योग्य काम आहे. येत्या आठवड्यात त्याच्या आणखी तीन मुलाखती होतील, असेही शहजादने सांगितले. शहजादला व्हिसाची सर्वात मोठी समस्या होती. यूकेमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'स्किल्ड वर्कर व्हिसा' आवश्यक असतो. शहजादच्या स्टुडंट व्हिसाची मुदत संपली होती. या कारणास्तव, त्याला काम करण्यासाठी या व्हिसाची आवश्यकता होती. यामुळेच तो अनेक कंपन्यांमध्ये अर्जही करू शकला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mba graduate got rejection 95 times then stand on road with resume got job in 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी