ग्रीसच्या संकटावरील बैठक मतभेदांमुळे रद्द

By Admin | Published: July 12, 2015 11:08 PM2015-07-12T23:08:34+5:302015-07-12T23:08:34+5:30

युरोझोनच्या एकच चलन व्यवहारात ग्रीसने राहायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी रविवारी झालेली युरोपियन झोनच्या सर्व २८ सदस्य देशांची बैठक रद्द झाली

Meeting on Greece's crisis was canceled due to differences | ग्रीसच्या संकटावरील बैठक मतभेदांमुळे रद्द

ग्रीसच्या संकटावरील बैठक मतभेदांमुळे रद्द

googlenewsNext

ब्रुसेल्स : युरोझोनच्या एकच चलन व्यवहारात ग्रीसने राहायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी रविवारी झालेली युरोपियन झोनच्या सर्व २८ सदस्य देशांची बैठक रद्द झाली. ग्रीसच्या मुद्यावरून युरोझोनमध्ये मतभेद असून ग्रीसला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणताही ठाम निर्णय ते घेऊ शकले नाहीत.
युरोझोनमधून ग्रीसला बाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी ही शिखर परिषद शेवटचा प्रयत्न होता; परंतु ग्रीसच्या डाव्या विचारांच्या सरकारबद्दल वाटणारा अविश्वास दूर करण्यात अपयश आल्यानंतर युरोझोनचे अर्थमंत्री चर्चेसाठी पुन्हा परतले. भांडवलाअभावी ग्रीसचे दारिद्र्य वाढत असून, येत्या काही दिवसांत त्याच्या बँका साफ कोसळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. मी युरोपियन युनियन शिखर परिषद रद्द केली आहे, असे युरोपियन परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी टिष्ट्वट करून सांगितले.
ग्रीसचे मूलगामी विचारांचे पंतप्रधान अलेक्सिस तिसिप्रास यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही, या मुद्यावर शनिवारी झालेली बोलणी तीव्र मतभेदांमुळे बंद पडली. मोठी आर्थिक मदत देऊ शकणारा देश जर्मनीने युरोतून सुटका होईल अशी ‘ग्रिक्झिट’ नावाची तात्पुरती योजना सादर केली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Meeting on Greece's crisis was canceled due to differences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.