भारत-पाकिस्तान रेंजर्सची ९ सप्टेंबरपासून बैठक

By admin | Published: September 6, 2015 10:23 PM2015-09-06T22:23:01+5:302015-09-06T22:23:01+5:30

पाकिस्तानसोबत आयोजित करण्यात आलेल्या महासंचालक स्तरावरील पाच दिवसीय बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया, घुसखोरी, कच्छच्या

The meeting of the India-Pakistan Rangers from September 9 | भारत-पाकिस्तान रेंजर्सची ९ सप्टेंबरपासून बैठक

भारत-पाकिस्तान रेंजर्सची ९ सप्टेंबरपासून बैठक

Next

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत आयोजित करण्यात आलेल्या महासंचालक स्तरावरील पाच दिवसीय बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया, घुसखोरी, कच्छच्या वाळवंटात बेकायदा प्रवेश आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन यासारखे प्रमुख मुद्दे भारतातर्फे उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. सीमेचे रक्षण करणाऱ्या दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांदरम्यान ९ सप्टेंबरपासून ही बैठक सुरू होणार आहे.
पाकिस्तानी रेंजर्सचे महासंचालक (पंजाब) मेजर जनरल उमर फारुकी बुरकी यांच्या नेतृत्वाखालील १६ सदस्यांचे प्रतिनिधीमंडळ ८ सप्टेंबरला भारतात येणार आहे. तेथून हे प्रतिनिधीमंडळ हवाईमार्गे अमृतसर येथे पोहोचेल. अमृतसर येथे सीमा सुरक्षा दलासोबत त्यांची ९ ते १३ सप्टेंबरपर्यंत बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय प्रतिनिधीमंडळातही १६ सदस्य असतील.

Web Title: The meeting of the India-Pakistan Rangers from September 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.