अफगाण तोडग्यासाठी पाकमध्ये संमेलन
By admin | Published: January 10, 2016 01:55 AM2016-01-10T01:55:10+5:302016-01-10T01:55:10+5:30
अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील चर्चेसाठी, उपाययोजना शोधण्यासाठी सोमवारी चार देशांचे एक संमेलन होत आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.
इस्लामाबाद : अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील चर्चेसाठी, उपाययोजना शोधण्यासाठी सोमवारी चार देशांचे एक संमेलन होत आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.
युद्धपीडित देशात चर्चेतून मार्ग काढण्यासाठी मागील वर्षी
चार देशांच्या समूहाची स्थापना करण्यात आली आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन व
अमेरिकेचे प्रतिनिधी या संमेलनात सहभाग घेतील. पाकचे प्रतिनिधित्व विदेश सचिव एजाज चौधरी आणि अफगाणिस्तानचे उप विदेश मंत्री हेकमत खलील, तर चीन आणि अमेरिकेचे प्रतिनिधित्व अफगाणिस्तान व पाकिस्तानातील त्यांचे विशेष दूत करणार आहेत. चारही देश चर्चेसाठी एक व्यासपीठ तयार करतील, तर चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी एक कार्यक्रमही निश्चित करतील. पहिल्या फेरीतील चर्चा जुलैमध्ये झाली होती; मात्र याच वेळी तालिबान प्रमुख मुल्ला उमरच्या मृत्यूच्या घोषणेमुळे ही प्रक्रिया थांबली होती. तालिबानसोबत शांततेच्या मार्गातील प्रत्येक पावलाचा अफगाणात विरोध होत आहे. (वृत्तसंस्था)