सुरळीत वाहतुकीबाबत बैठकीतून सोपस्कार
By Admin | Published: August 27, 2014 01:08 AM2014-08-27T01:08:04+5:302014-08-27T01:35:41+5:30
जालना : नवीन व जुना जालना भागातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून जिल्हा महसूल प्रशासनाने सोमवारी घेतलेल्या संयुक्त बैठकीतून वाहतुकीसंदर्भात थातूरमातूर चर्चा करण्यात आली
दिल्ली/मुंबई : पश्चिम आफ्रिकी देशात इबोला या आजाराने निर्माण केलेल्या दहशतीदरम्यान लायबेरिया व नायजेरियातून भारतात आलेल्या नागरिकांची अतिशय कडक तपासणी केली जात असून दिल्ली विमानतळावर आलेल्या ६ नागरिकांना विमानतळ प्रशासनाने इबोला चाचणीसाठी ४० दिवसांकरिता वेगळे ठेवले असल्याचे तर मुंबई विमानतळावर आलेल्या ८५ नागरिकांमध्ये इबोलाची कुठलीच लक्षणे आढळली नसल्याने विमानतळ आरोग्य संघटनेने घोषित केले आहे. इबोलाग्रस्त देशात या आजाराने १४०० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत.
दिल्ली विमानतळावर उतरलेल्या व रुग्णालयात दाखल केलेल्या प्रवाशांमध्ये दोन महिला व एका बालकाचा समावेश असून त्यांच्यात इबोलाची लक्षणे आढळतात अथवा नाही यावर लक्ष ठेवले जाणार आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईत दाखल झालेले हे प्रवासी तीन गटात आले असून आज दिवसभरात आणखीही काही प्रवासी येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. २० प्रवाशांचा एक गट साऊथ आफ्रिकन एअरवेजच्या विमानाने येथे पोहचला. त्यांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यात इबोलाची लक्षणे आढळली नसल्याचे विमानतळ प्रशासनाने जाहीर केले. लायबेरियाहून आलेले ४६ भारतीयांचे दुसरे पथक येथे पोहचले. या सर्व प्रवाशांची तपासणी करून त्यांना निरोगी जाहीर करण्यात आले. नायजेरियाहून आलेल्या १९ अन्य भारतियांचीही तपासणी करून त्यांना निरोगी घोषित करण्यात आले. इबोलाग्रस्त देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या ४४,७०० एवढी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)