ट्रंपच्या सभेत शीख तरुणाने केला विरोध

By admin | Published: January 26, 2016 02:21 AM2016-01-26T02:21:20+5:302016-01-26T02:21:20+5:30

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षातील स्पर्धक डोनाल्ड ट्रंप यांच्या सभेत एका शीख व्यक्तीने बॅनर फडकावत त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

In the meeting of the Trump, the youth of the youth protested | ट्रंपच्या सभेत शीख तरुणाने केला विरोध

ट्रंपच्या सभेत शीख तरुणाने केला विरोध

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षातील स्पर्धक डोनाल्ड ट्रंप यांच्या सभेत एका शीख व्यक्तीने बॅनर फडकावत त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बॅनरवर ंविद्वेष थांबवा ंअसा मजकूर लिहिलेला होता. मात्र त्याला लगेचच बाहेर काढण्यात आले.
डोनाल्ड ट्रंप हे आयोवा प्रांतात प्रचारासाठी गेले होते. तिथे भाषणात त्यांनी काही मुस्लिमविरोधी वक्तव्ये केली. इस्लामी अतिरेक जगात सर्वत्र वाढतो आहे, पण त्याविषयी आपले राष्ट्राध्यक्ष गप्प बसतात, असे सांगत ते म्हणाले की, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये पहिले विमान घुसवण्यात आले, नंतर पेंटागॉनपाशी घुसवले. हे सांगत असतानाच त्या शीख व्यक्तीने अचानक विद्वेष थांबवा, असा मजकूर असलेला बॅनर फडकावण्यास सुरवात केली. तो बॅनर फडकावत असताना ट्रंप यांनी त्याच्याकडे हात दाखवत बाय, बाय, गुडबाय असे उद्गार काढले. त्यावेळी त्या सभेला आलेले श्रोते अमेरिका अमेरिका अशा घोषणा देत होते. आयोवा येथील प्रचार डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आयोवामधील सत्ताधारी गटाची भूमिका १ फेब्रुवारी रोजी निश्चित होणार असून, त्यातून रिपब्लिकन पक्षातील प्राथमिक फेरीचा अंदाज कळू शकेल, असे मानले जाते. (वृत्तसंस्था)

Web Title: In the meeting of the Trump, the youth of the youth protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.