मायक्रोसॉफ्टमध्ये मेगा कपात
By admin | Published: July 17, 2014 02:12 PM2014-07-17T14:12:42+5:302014-07-17T14:13:17+5:30
तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखला जाणा-या मायक्रोसॉफ्टमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात केली जाणार आहे.
Next
ऑनलाइन टीम
न्यूयॉर्क, दि. १७ - तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखला जाणा-या मायक्रोसॉफ्टमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात केली जाणार आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणा-या सुमारे सहा हजार कर्मचा-यांना 'नारळ' दिला जाणार असून लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल.
भारतीय वंशांचे सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टच्या सीईओचा पदभार स्वीकारल्याच्या पाच महिन्यांच्या आतच ऐवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाडेला यांनी गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टमधील कर्मचा-यांना एक ईमेल पाठवला असून यात कपातीचे संकेत देण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टने नुकत्याच विकत घेतलेल्या नोकियामधील कर्मचा-यांना या कपातीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. याशिवाय एक्स बॉक्स गेम आणि इंटरटेनमेंट या विभागातही कपात केली जाईल असे समजते.